Seven killed, 20 injured in vehicle crash in Toranmal | तोरणमाळ येथे ५०० फूट खोल दरीत वाहन कोसळून सातजण ठार, २० जण जखमी

तोरणमाळ येथे ५०० फूट खोल दरीत वाहन कोसळून सातजण ठार, २० जण जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राम्हणपुरी, ता.शहादा : थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटनस्थळी खडकी जाणाऱ्या घाटात ५०० फूट खोल दरीत मजुरांचे वाहन उलटून सातजण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. अपघातात २० जण जखमी झाले आहेत. बचावकार्य सुरू असून जखमींना तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. 

सातपुड्याच्या सहाव्या रांगेतील खडकी हे गाव खोल दरीत आहे. तेथे जाण्यासाठी नुकताच तोरणमाळ ते खडकी हा घाट रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याचे अद्यापही ठिकठिकाणी काम बाकी आहे. शनिवारी सकाळी खडकीहून तोरणमाळकडे मजुर घेऊन येणारे पीकअप वाहनाच्या चालकाचे नियंत्रण तीव्र चढाव आणि वळणावर सुटले. त्यामुळे वाहन थेट ५००फूट खोल दरीत कोसळले. त्यात सातजण ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. २० जण जखमी झाले असून त्यांच्यावर तोरणमाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत आहे. बचाव कार्य सुरू असून म्हसावद पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. 

Web Title: Seven killed, 20 injured in vehicle crash in Toranmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.