सॅम-मॅम बालकांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:38 AM2020-06-04T11:38:26+5:302020-06-04T11:45:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात ...

Sam-mam appointed a team to investigate the children | सॅम-मॅम बालकांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त

सॅम-मॅम बालकांच्या तपासणीसाठी पथक नियुक्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गंत जिल्ह्यात आरोग्य व पोषण निर्देशांकात सुधारणा करण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे़ यांतर्गत अक्कलकुवा व धडगांव तालुक्यात ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व लसीकरण, गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी आणि लसीकरण तसेच सॅम आणि मॅम बालकांचा शोध घेतला जाणार आहे़
१४ जूनपर्यंत ही विशेष मोहिम सुरु राहणार आहे़ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेसाठी ९७ वैद्यकीय अधिकारी, ६५ अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि स्वयंसेवी संस्थेच्या २५ सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे़ आरोग्य केंद्रांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या उपकेंद्रनिहाय तयार करण्यात आलेल्या पथकांचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रनिहाय विशेष पथकामार्फत ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करुन बालकांचे वजन, उंची,लांबी घेऊन सॅम आणि मॅम बालकांचा शोध आणि गरोदर व स्तनदा मातांची आरोग्य तपासणी लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच ० ते ६ वर्ष वयोगटातील स्थलांतराहून परत आलेल्या लाभार्थींची स्वतंत्र यादी तयार करुन त्यांची आरोग्य तपासणी करून बाळ कुपोषणात जाऊ नये याकरिता मार्गदर्शनही करण्यात येणार आहे. कोरोनापासून बचावाकरिता पथकातील कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेले ट्रिपल लेयर मास्क, फेस शील्ड, ग्लोव्हज, सॅनिटायझर, कॅप इत्यादी साहित्य पुरविण्यात आलेले आहे. अंगणवाडी स्तरावर स्क्रिनिंग करतांना लाभार्थींना टप्याटप्यात बोलविण्यात येणार असून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करणे, पाणी व साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची कटाक्षाने काळजी घेण्यात येणार आहे. सॅम व मॅम बालकांना मोहिमेनंतर व्हिसीडीसी, एनआरसी, सीटीसीद्वारे उपचार होणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली आहे.

लॉकडाऊनमुळे दुर्गम भागातील बालकांच्या तपासणीचे कामकाज रखडले होते़ अंगणवाड्या बंद असल्याने सॅम-मॅम बालकांच्या नियमित बालकांच्या तपासणीचा प्रश्न होता़ पावसाळ्यात अडचणी वाढण्याची चिन्हे असल्याने जिल्हा प्रशासनाने विशेष मोहिम आखून त्यात वैद्यकीय अधिकाºयांचा समावेश करुन दिला आहे़

Web Title: Sam-mam appointed a team to investigate the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.