प्लास्टिक बूचची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST2021-07-07T04:37:20+5:302021-07-07T04:37:20+5:30

नियमांचे उल्लंघन नंदुरबार : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक बेफिकीरपणे वागत असून ...

Sale of plastic butchers | प्लास्टिक बूचची विक्री

प्लास्टिक बूचची विक्री

नियमांचे उल्लंघन

नंदुरबार : कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, काही नागरिक बेफिकीरपणे वागत असून त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. बाजारात गर्दी होत असून नागरिकांकडून कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येते.

डासांचा त्रास

नंदुरबार : शहरासह नवीन वसाहतींमध्ये डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांकडून धूर फवारणी करण्याची मागणी होत आहे. संबंधित विभागाने डास निर्मूलनासाठी प्रभावी उपाययोजना राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रोजगार उपलब्ध करावा

नंदुरबार : वर्षभरापासून कोरोनामुळे अनेकांचा रोजगार हिरावून घेतला आहे. वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद राहत असल्याने किराणा, कापड व इतर दुकानांवर काम करणाऱ्यांना घरीच बसावे लागत आहे. त्यामुळे त्यांना शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.

गटारींचे झाकणे गायब

नंदुराबर : शहरातील अनेक भागांत गटारींचे झाकण गायब झाल्याने पावसाळ्यात त्यात पाणी भरल्यानंतर त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत असतात. खोडाईमाता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघडी गटार धोकेदायक ठरत आहे.

Web Title: Sale of plastic butchers