शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

शहादा पोलिसांचे शहरात पथसंचालन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 12:53 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून, संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मंगळवारी सायंकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात संचारबंदी लागू असून, संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे मंगळवारी सायंकाळी शहराच्या विविध भागातून पथसंचलन करण्यात आले.देशात कोरोनाचे सावट गडद होत चालले आहे. महाराष्ट्रात दररोज कोरोना सदृश्य रुग्ण दिवसा गणिक वाढत चालले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन व प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत असल्या तरी घरात थांबणे यावर सर्वात मोठा उपाय आहे. परंतु अनेक जण हा उपाय पाळत नसल्याने सद्या संपूर्ण देशात लॉकडाऊनची स्थिती आहे. तरीही महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे.१४ एप्रिल पावेतो लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे संचारबंदी शिथील होते का वाढते हे प्रश्नांकित असून, पुढील उपाययोजनांसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाल्याचे शहरात झालेल्या पथसंचलनावरून दिसून आले.संचारबंदीच्या दरम्यान पोलीस उपविभागीय अधिकारी पुंडलिक सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील संवेदनशील तसेच वर्दळीच्या परिसरातून पोलिसांनी पथसंचलन केले. पथसंचलनाची सुरूवात जुन्या तहसील कार्यालयापासून करण्यात आली. खेतिया रोड, गरीब नवाज कॉलनी, एकलव्य नगर, जामा मशिद परिसर, सोनार गल्ली, आझाद चौक, गांधी चौक, पिंजार गल्ली, जनता चौक मार्गे काढीत पुन्हा जुन्या तहसील कार्यालयाजवळ समारोप करण्यात आला.या पथसंचलनात शहादा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, वाहतूक पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता. या पथसंचलनात पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील, सहायक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, नीलेश वाघ, पोसई योगिता पाटील, विक्रांत कचरे, इनामदार, भगवान कोळी आदींनी सहभाग घेतला.