बॅरेज काठावर असल्याने प्रकाशात घेतला आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 11:27 IST2020-06-04T11:27:32+5:302020-06-04T11:27:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रकाशा येथे चक्रीवादळा चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात घंटागाडीवर लाऊडस्पीकर ने दवंडी देण्यात ...

Review taken light since the barrage is on the edge | बॅरेज काठावर असल्याने प्रकाशात घेतला आढावा

बॅरेज काठावर असल्याने प्रकाशात घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : प्रकाशा येथे चक्रीवादळा चा संभाव्य धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीकडून गावात घंटागाडीवर लाऊडस्पीकर ने दवंडी देण्यात आली. दरम्यान, गाव दोन नद्या आणि बॅरेजच्या काठावर वसले असल्यामुळे विशेष सतर्कता ठेवण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, चक्रीवादळ तथा पावसाचा संभाव्य धोका पाहता गावांमध्ये खबरदारी घेण्यात आली. सकाळपासूनच रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. दुपारी दोन नंतर पावसाने जोर पकडला. ग्रामपंचायतीने घंटागाडीवर लाऊडस्पीकर लावून गावात दवंडी देत सतर्कतेचे आवाहन केले.
दुपारी शहादा गट विकास अधिकारी सी .टी. गोसावी, विस्तार अधिकारी बी.एफ.निकुम, बेलदार, प्रकाशा ग्रामविकास अधिकारी बी.जी.पाटील, सरपंच सुदाम ठाकरे, तलाठी डी.एम.चौधरी, कृषी सहाय्यक जी.व्ही.खेडकर, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यासह तातडीची बैठक घेण्यात आली व आपत्ती व्यवस्थापनावर चर्चा करण्यात आली.

Web Title: Review taken light since the barrage is on the edge