अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST2021-02-05T08:07:07+5:302021-02-05T08:07:07+5:30

सर सय्यद उर्दू गर्ल्स स्कूल शहादा मोहिदा : शहादा येथील सर सय्यद उर्दू गर्ल्स प्राथमिक, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ...

Republic Day celebrations in subsidized primary and secondary ashram schools | अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

सर सय्यद उर्दू गर्ल्स स्कूल शहादा

मोहिदा : शहादा येथील सर सय्यद उर्दू गर्ल्स प्राथमिक, हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला.यावेळी ध्वजारोहण संस्थेचे अध्यक्ष प्रा. सय्यद लियाकत अली यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव मंजूरखान पठाण, संस्था सभासद अब्दुल हासमानी, निरीक्षक प्रा. ज्ञानी कुलकर्णी,प्राचार्या बिलकीस हासमानी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला.

कळंबु ग्रा.पं.येथे सामूहिक संविधान उद्देशिकेचे वाचन

शहादा: तालुक्यातील कळंबु येथे ग्रामपंचायतीत कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.यावेळी ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे लोकनियुक्त सरपंच सुवर्णा बोरसे तर जि.प.मराठी शाळेत उपसरपंच वासुदेव बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला माजी.पं.स.सदस्य हिंमतराव बोरसे,तलाठी जयवंत पाटील,पोलीस पाटील अमरदार पाटील,जि.प.शाळा मुख्याध्यापक नवल देवरे,शिक्षक राकेश पाटील, निलेश शिवदे,संदीप राकडे,मंगल धनगर, शुभांगी बडगुजर,शालेय समितीचे अध्यक्ष,ग्रा.पं.चे सदस्य,कर्मचारी,अंगणवाडी सेविका,आशा कर्मचारी, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन ध्वजारोहण व संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

Web Title: Republic Day celebrations in subsidized primary and secondary ashram schools