शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरून आलेल्यांची माहिती तात्काळ कळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यालगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यालगतच्या भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याने जिल्ह्यात बाहेरून आलेल्या व्यक्तींवर विशेष लक्ष देण्यात येत आहे. त्यामुळे बाहेरून आपल्या गावात, परिसरात आलेल्या सर्व व्यक्तींची माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.नंदुरबार जिल्ह्यालगतच्या मालेगाव, नाशिक, जळगाव, सेंधवा या शहर व जिल्ह्यांच्या सरहद्दीवर कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. या परिसरातून तसेच इतर राज्य व देश येथूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक जिल्ह्यात आलेले असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ९ एप्रिल रोजीच्या पाच दिवस आधी जे नागरिक जिल्हा, राज्य, देशाबाहेरून नंदुरबार जिल्ह्यात वास्तव्यास आलेले असतील त्यांनी तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे किंवा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. त्यांच्या प्रवासाबाबतची सत्य माहिती कळवावी. जेणेकरून प्रशासनास त्यावर उपाययोजना करणे शक्य होईल. प्रशासनापासून माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी गेल्या पाच दिवसात आपल्या भागात कुणी नवीन व्यक्ती वास्तव्यास आली असेल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षातील (०२५६४-२१०११३) या क्रमांकाशी संपर्क साधावा. माहिती देणाºयाचे नाव व इतर माहिती गोपनीय ठेवली जाईल असे आवाहनही पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले आहे.