शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा काँग्रेसतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : केंद्र शासनाच्या शेतकरी आणि कामगार विरोधी धोरणाचा काँग्रेसतर्फे गांधी जयंतीचे औचित्य साधून निषेध करण्यात आला. गांधींजींना आदरांजली अर्पण करून नंतर हुतात्मा स्मारकात धरणे धरण्यात आले. यावेळी पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व नेते उपस्थित होते.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार कायदे व इतर धोरणांचा निषेध म्हणून गांधी जयंतीदिनी हे आंदोलन झाले. पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी, जिल्हा परिषद अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी, आमदार शिरिष नाईक, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सुभाष पाटील, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, सुहास नाईक, देवमन पवार, पंडितराव पवार, राजेंद्र पाटील, देवा चौधरी, रऊफ शाह आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मोदी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलतांना पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी केंद्र सरकार हे भांडवालदारांना पाठीशी घालणारे आणि शेतकरी, कामगारांना उघड्यावर आणणारे सरकार आहे. सामान्यांच्या हिताचे कुठलेही निर्णय या सरकारने घेतले नसल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने जाऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मोदी सरकारने शेती आणि शेतकरी यांच्या विरोधात षडयंत्र रचले आहे. तीन काळ्या कायद्याच्या माध्यमातून देशातील हरीतक्रांती नष्ट करण्याचा कुटील डाव रचला आहे. जगाचा पोशिंदा, अन्नदाता शेतकरी व शेतमजूर यांना काही उद्योगपतींचे गुलाम बनविण्याचे एक मोठे षडयंत्र आहे. देशातील ६२कोटी शेतकरी, कामगार व २५० पेक्षा अधीक शेतकरी संघटना या काळ्या कायद्याच्या विरोधात आवाज उठवत आहेत. पण पंतप्रधान मोदी व त्यांचे सरकार या आवाजाकडे दुर्लक्ष करून देशाची दिशाभूल करीत आहे. शेतकऱ्यांचा आवाज ऐकणे तर दुरच शेतकºयांचे संसदेतील प्रतिनिधी असलेल्यांचा आवाजही बंद केला आहे. शेतकºयांवर लाठीमार करून त्यांना वेठीस धरले जात आहे. बहुमताच्या जोरावर तीन काळे कायदे मंजूर करून घेतले असल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.