शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मंदाणे येथे कोरोना पुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:55 IST

पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० पासून गायब झालेल्या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये ...

पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० पासून गायब झालेल्या आजाराने पुन्हा डोके वर काढल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. गावात कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतली जात नसल्याने आणि कोणाकडूनही कोणत्याही प्रकारचे शासकीय आदेशाचे पालन होत नसल्याने तसेच तोंडाला मास्क लावून फिरणे आणि सामाजिक अंतर ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने बधितांची संख्या वाढत चालली आहे. यावर प्रशासनाने आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. नाही तर मागील वर्षासारखी भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

मंदाणे येथे ९ मार्च रोजी एकाच घरात तीन रुग्ण आढळून आले. त्यापैकी एका बधिताचा मृत्यू झाल्याची घटना घडली. १० मार्च रोजी पुन्हा एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तिघा पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील त्या रुग्णांच्या घराला ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून सॅनिटायझर करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडून भेट देऊन आजूबाजूला कोणालाही आरोग्याबाबत काही त्रास झाल्यास तात्काळ संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदाणे गाव हे जवळपास ४० खेड्यांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. यामुळे याठिकाणी बाजार करण्यासाठी बाहेरून येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या कोणत्याही आदेशाचे पालन गावात करण्यात येत नाही. कोणत्याही नागरिकांच्या तोंडावर मास्क आढळत नाही किंवा कोणत्याही दुकानावर व इतर ठिकाणी सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवले जात नाही. गावात सगळीकडे मोकळेपणाने वावर असल्याने मागील वर्षासारखी परिस्थिती तर ओढवणार नाही ना? अशी भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. गावात बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.