साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:48 IST2020-03-12T21:48:40+5:302020-03-12T21:48:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू असून, बुधवारी २०० गाड्या ...

Purchase of cotton for one and a half thousand quintals | साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी

साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सीसीआयतर्फे कापूस खरेदी सुरू असून, बुधवारी २०० गाड्या कापूस आल्या होता. त्यापैकी सुमारे साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे. या आठवड्यात १४ मार्चपर्यंत कापूस खरेदी केली जाईल, अशी माहिती समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली.
शासनाच्या कॉटन कापोर्रेशन आॅफ इंडिया सीसीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कापसाची खरेदी केली जात आहे. स्थानिक व्यापाऱ्यांकडून योग्य तो भाव न मिळाल्याने शेतकºयांनी कापूस विक्री ना करता सांभाळून ठेवला होता. गत महिन्यापासून सीसीआयमार्फत जिल्ह्यात नंदुरबार व शहादा या दोन ठिकाणी कापसाची खरेदी केली जात होती. मात्र खरेदी केलेला कापूस ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध होत नसल्याने बºयाच वेळा ही खरेदी थांबविली जात होती.
शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारपासून १४ मार्चपर्यंत सीसीआयमार्फत कापसाची खरेदी केली जात आहे. पहिल्या दिवशी सुमारे २०० गाड्या कापूस विक्रीसाठी समितीच्या आवारात दाखल झाल्या होता. त्यापैकी सायंकाळी उशिरापर्यंत १०० गाड्यांचे मोजमाप झाले असून, यातून सुमारे साडेचार हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.
या आठवड्यात १४ मार्चपर्यंत खरेदी करण्यात येणार असल्याने शेतकºयांनी आपला कापूस बाजार समितीत आणावा असे आव्हान चेअरमन सुनील पाटील व संचालक मंडळाने केले आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यात शहादा हे सीसीआयचे एकमेव खरेदी केंद्र सुरू आहे. बुधवारपर्यंत येथे सुमारे एक लाख लाख ६३ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली आहे.

Web Title: Purchase of cotton for one and a half thousand quintals