शहाद्यात ३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:41+5:302021-04-08T04:30:41+5:30

कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी, म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही काळ सूट ...

Punitive action against 35 vehicle owners in Shahada | शहाद्यात ३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

शहाद्यात ३५ वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

कोरोना संक्रमणाची साखळी तुटावी, म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर पावले उचलण्यात येत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी काही काळ सूट देत, १ ते १५ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडायला बंदी आहे, तसेच मुख्य बाजार परिसरात येताना नागरिकांनी दुचाकी आणू नये, असे पोलीस प्रशासनातर्फे अनेकदा बजावूनही नागरिक विनाकारण दुचाकी आणून नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत होते. काही नागरिक गरज नसताना शहरात वाहनाने फेरफटका मारताना दिसत आहेत, तर काही अल्पवयीन मुलेही कारण नसताना गावात गर्दी करत आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे यांनी दिला आहे. विनाकारण फिरणारे, मास्कचा वापर न करणारे व कोरोनाचे इतर नियम न पाळणाऱ्या ३५ वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाई करीत सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई वाहतूक विभागाचे कपिल देसले, रमेश पाटील आदींनी केली.

Web Title: Punitive action against 35 vehicle owners in Shahada