शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींसाठी ३० हजार क्विंटल धान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:20 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे राज्यातील बहुतांश आदिवासी कुटूंबांवर उपासमारीची वेळ येवू नये यासाठी आदिवासी विकास विभागाने ३० हजार ३४५ क्विंटल धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.सध्या कोरोनामुळे रोजगारावरच उदरनिर्वाह असलेल्या आदिवासी कुटूंबांची अवस्था बिकट आहे. या संकट काळात सरकारच्या उपाययोजनां सदर्भात अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले की, गेल्या तीन आठवड्यांपासून आपण सातत्याने या संदर्भात लक्ष केंद्रीत करून आहोत. विशेषत: नंदुरबार जिल्ह्यातील हजारो मजूर परराज्यात रोजगारासाठी गेल्याने त्यांची माहिती घेवून ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी मदत कार्य पोहचविण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. सद्य स्थितीत गुजरातमध्ये सुमारे १२ ते १५ हजार मजूर अडकून असल्याने त्या मजुरांना महाराष्टÑात कसे आणले जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी नुकतीच चर्चा केली असून मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या संदर्भात दिल्लीतही चर्चा झाली. मात्र, काही अडचणी असल्याने अद्याप तरी ते मजूर आणण्यासंदर्भात निर्णय झालेला नाही. परंतु या सर्व मजुरांना शासनाचे सर्व नियम पाळत महाराष्टÑात आणावे आणि महाराष्टÑाच्या सिमेतच त्यांना कॉरंटाईन करून तेथेच सर्व सुविधा देण्याचा आपला प्रयत्न आहे.याशिवाय राज्यातील आदिम जमात तसेच स्थलांतरीत मजूर यांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी धान्य देण्याची योजना आदिवासी विकास विभागाने मंजुर केली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनीही मंजुरी दिल्याने लवकरच सुमारे ३० हजार ३४५ क्विंटल धान्य या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर राज्यातील सर्व आदिवासींना जे जे शक्य त्या सुविधा देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा प्रयत्न सुरू आहे. तसे निर्णयही घेण्यात आले आहेत.राज्यातील मनरेगात काम करणाऱ्या ११ लाख ५० हजार मजुरांसाठी आदिवासी विकास विभागाने नवीन योजना तयार केली आहे. त्यासाठी साधारणत: ६०० कोटी रुपये निधी लागणार आहे. त्यातील ५०० कोटी रुपये आदिवासी विकास विभाग देणार असून १०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. किंवा हा निधी केंद्राकडून मिळावा यासाठीही मागणी करण्यात आली आहे. त्याचा निर्णय होताच साडे अकरा लाख मजुरांसाठी धान्य कोष योजनेच्या धर्तीवर नवी योजना लवकरच कार्यान्वीत करणार असल्याचे अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी सांगितले.