शहाद्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 11:33 AM2020-06-04T11:33:10+5:302020-06-04T11:33:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरणाने गारवा निर्माण झाला असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. २४ ...

Operation control room in Shahada | शहाद्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

शहाद्यात नियंत्रण कक्ष कार्यान्वीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरणाने गारवा निर्माण झाला असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. २४ तासात पाऊस, अतिवृष्टी, तसेच जोराचे वादळवारे वाहण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
तहसिल कार्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात महसूल, नगरपालिका, नगरपंचायत, पोलीस, आरोग्य, विज वितरण, कृषी विभागातील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली. नियंत्रण कक्षातून तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, कृषीसेवक यांच्याशी वेळोवेळी संपर्क करुन गावातील स्थितीचा आढावा घेण्यात यावा.
बाजारात गर्दी
पावसापासून संरक्षण करण्यासाठी आज सकाळपासून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या संख्येने नागरिकांनी प्लास्टिकचे कापड खरेदी करण्यास पसंती दिली. विशेष म्हणजे मुख्य रस्त्यावर प्लॅस्टिक कागद विक्रेत्यांनी रस्त्याच्या मधोमध विक्री करून रस्त्यावर तात्पुरते अतिक्रमण करून रहदारीला अडथळा निर्माण केला होता प्लास्टिक कापड खरेदीसाठी व इतर आवश्यक वस्तू खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मुख्य रस्त्यावरील बाजार चौक ते जामा मशीद या भागात गर्दी केली होती. शहरात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले असले तरी काही ठिकाणी प्रशासनातर्फे शिथिलता देण्यात आली.

Web Title: Operation control room in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.