शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक गावावर आली खरेदीची आफत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:26 IST

मनोज शेलार ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘कांदा’ कधी शेतक:याचा तर कधी ग्राहकांचा ‘वांदा’ करीत असतो. ‘कांदा’ने दिल्ली ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘कांदा’ कधी शेतक:याचा तर कधी ग्राहकांचा ‘वांदा’ करीत असतो. ‘कांदा’ने दिल्ली सरकार पाडल्याचाही इतिहास आहेच. असा हा ‘कांदा’ यंदा काही शेतक:यांची चांदी करून जात आहे. दुसरीकडे मात्र अतिपाऊस, वातावरणातील वारंवार झालेला बदल यामुळे उत्पादन अवघ्या 10 टक्क्यांवर आल्याची स्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वाधिक कांदा उत्पादन घेणा:या ‘आसाणे’ गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना यंदा कांदा विकत घेण्याची वेळ आल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.    खरीपातील कांदा उत्पादन यंदा कमी झाल्याने कांद्याचे भाव यंदा लक्षवेधी ठरत आहे. 50 ते 80 रुपये किलो दराने कांदा विक्री होत आहे. ज्या शेतक:यांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना चांगले उत्पन्न मिळाले. परंतु काही शेतक:यांचा उत्पादन खर्च देखील भरून निघाला नसल्याची स्थिती आहे. यामुळे बाजारात टंचाई निर्माण होऊन यंदा कांदा चांगलाच भाव खात असल्याचे चित्र देशभरात दिसून येत आहे. कांदा उत्पादन घेणा:या जिल्ह्यातील काही गावांमध्ये नंदुरबार तालुक्यातील आसाणे, घोटाणे, सैताणे, कार्ली, रजाळे, खर्दे, खोक्राळे, शनिमांडळ या गावांचा उल्लेख केला जातो. त्यातल्या त्यात आसाणे हे गाव कांदा लागवड आणि उत्पादनाबाबत नेहमीच ‘टॉप’वर असते. यंदा मात्र याच गावातील कांदा उत्पादक शेतक:यांना कांदा विकत घ्यावा लागत असल्याचे चित्र आहे.कांद्याला हलकी व मध्यम स्वरूपाची जमीन लागते. तालुक्यातील पूर्व भागातील आसाणेसह परिसरातील गावे ही अवर्षण प्रवण असल्यामुळे कमी पावसात या भागात कांदा उत्पादन मोठय़ा प्रमाणावर घेतले जाते. पोषक जमिन आणि वातावरण राहत असल्यामुळे कांदा उत्पादनात हा परिसर नेहमीच अग्रेसर असतो.  आसाणे गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या क्षेत्रापैकी किमान 50 क्षेत्रात तरी कांदा लागवड करतो. काही शेतकरी दोन्ही पीक हे कांदाच घेत असतो. या परिसरात नायलॉन, फुले समर्थ, रांगडा, डार्करेड आणि भिमा सुपर या वाणांची सर्वाधिक लागवड होते. त्यातल्या त्यात फुले समर्थ याला सर्वाधीक पसंती असते. लाल कांदा 90 टक्के तर पांढरा कांदा 10 टक्के लागवड केला जातो. रासायनिक खतांची मात्रा कमी करून जास्तीत जास्त शेतकरी आता सेंद्रीय कांदा उत्पादनाकडे वळू लागले आहेत. यंदा मात्र तब्बल 140 टक्के पाऊस झाल्याने आणि जमिनीत सतत चार ते पाच महिने ओलावा राहिल्यामुळे कांदा जमिनीतच सडला. परिणामी उत्पादन अवघ्या 10 टक्क्यांवर आले आहे. यामुळे एकरी 50 ते 55 हजार रुपये खर्च करूनही उत्पादन हाती काहीच आले नसल्यामुळे शेतकरी कजर्बजारी झाला       आहे. आता रब्बीवर आशा असली तरी शेतक:याकडे कजर्बाजारीपणामुळे भांडवलच नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. ज्या शेतक:यांना थोडेफार उत्पादन झाले त्यांना चांगला भाव मिळत आहे. येथील कांदा हा इंदोरच्या बाजारात सर्वाधिक जातो. सध्या त्या ठिकाणी 60 ते 70 रुपये किलो दराने ठोक भावात कांदा खरेदी होत आहे. 

बेभरोवशाचे गणित..कांदा उत्पादन हे शेतक:यांच्या दृष्टीने बेभरोवशाचे गणित असा प्रकार असतो. एखाद्या वर्षी कांद्याला अपेक्षेपेक्षा अधीक भाव मिळून जातो तर कधीकधी कांदा फेकावा लागतो. आसाणे गावाला 2013 मध्ये कांद्याचे मोठय़ा प्रमाणावर उत्पादन झाले होते. त्यावेळी गावात आठ ते दहा ट्रॅक्टर व 40 पेक्षा अधीक दुचाकी खरेदी झाल्या होत्या असे गावातील काही जणांनी सांगितले. मात्र नंतरच्या वर्षी कांदा अक्षरश: मातीमोल भावात विकावा लागला. गाडीभाडे देखील निघत नव्हते अशी स्थिती झाली होती.