कोठली येथे एक लाखाचे कापसाचे बीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST2021-05-16T04:30:07+5:302021-05-16T04:30:07+5:30

कोठली येथे कापसाचे एचटीबीटी बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कोठली येथे नारायण दगा गिरासे ...

One lakh cotton Bt seeds seized at Kothali | कोठली येथे एक लाखाचे कापसाचे बीटी बियाणे जप्त

कोठली येथे एक लाखाचे कापसाचे बीटी बियाणे जप्त

कोठली येथे कापसाचे एचटीबीटी बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कोठली येथे नारायण दगा गिरासे यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता, एक लाखाचे बियाणे मिळून आले. ते जप्त करून गिरासे यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाख़ाली तालुका कृषी अधिकारी शहादा किशोर हडपे व् जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नरेंद्र पाडवी यांनी संयुक्तपणे केली. यावेळी कृषि पर्यवेक्षक सुरेश बागुल व कृषि सहाय्यक राहुल खेडकर उपस्थित होते.

कोठली येथे कापसाचे एचटीबीटी बियाणे विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार कोठली येथे नारायण दगा गिरासे यांच्या राहत्या घरी छापा टाकला असता, एक लाखाचे बियाणे मिळून आले. ते जप्त करून गिरासे यांच्याविरुद्ध सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे यांच्या मार्गदर्शनाख़ाली तालुका कृषी अधिकारी शहादा किशोर हडपे व जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी नरेंद्र पाडवी यांनी संयुक्त केली. यावेळी कृषी पर्यवेक्षक सुरेश बागुल व कृषी सहायक राहुल खेडकर उपस्थित होते.

Web Title: One lakh cotton Bt seeds seized at Kothali