आता स्मशानभूमीतही जागा फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:30 IST2021-04-08T04:30:46+5:302021-04-08T04:30:46+5:30

नंदुरबार : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्याने आता स्मशानभूमीदेखील फुल्ल होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचीही धावपळ होऊ ...

Now the cemetery is full | आता स्मशानभूमीतही जागा फुल्ल

आता स्मशानभूमीतही जागा फुल्ल

नंदुरबार : कोरोनामुळे मृतांची संख्या वाढल्याने आता स्मशानभूमीदेखील फुल्ल होऊ लागली आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचीही धावपळ होऊ लागली आहे.

पहिल्या टप्प्यात नंदुरबार जिल्ह्यात कोरोना काहीसा नियंत्रणात होता. परंतु, यंदा तो हाताबाहेर जात आहे. त्यातच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नंदुरबार जिल्ह्यात तशी परिस्थिती नसली तरी मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा दिवसांत ६२ जणांचा कोरोनाने, तर नैसर्गिक मृत्यू पाच झाले आहेत.

दररोजचा विचार करता उपलब्ध आकडेवारीनुसार, कोरोनाने साधारणत १० ते १२ जणांचा मृत्यू होत असल्याचे चित्र आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत असल्या तरी गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा आलेख चढताच आहे.

Web Title: Now the cemetery is full