शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

सव्वा नऊ लाखाची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार/नवापूर : महाराष्टÑातून गुजरातमध्ये विनापरवाना विक्रीसाठी जाणाऱ्या तीन ट्रकांमधून ९ लाख ३६ हजारांचा दारूसाठा स्थानिक गुन्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार/नवापूर : महाराष्टÑातून गुजरातमध्ये विनापरवाना विक्रीसाठी जाणाऱ्या तीन ट्रकांमधून ९ लाख ३६ हजारांचा दारूसाठा स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेच्या पथकाने जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोनजण फरार झाले. पोलिसांनी दारूसाठ्यासह एकुण २७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.नवापूर तालुक्यातून गुजरामध्ये दारूसाठा जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांच्या पथकाने ७ एप्रिल रोजी रात्री नवापूरनजीक सापळा लावला होता. रात्री अडीच वाजेच्या सुमारास खेकडा रस्त्यावरून ट्रक भरधाव जातांना दिसले. पथकाने बॅटरीच्या उजेडात त्यांना थांबण्याचा इशारा करूनही ते थांबले नाही. पाठलाग करून तिन्ही वाहनांना अडविले.एका वाहनात अशोक लोटन मराठे, रा.महाराष्टÑ व्यायाम शाळेजवळ, नंदुरबार व अनिल मनोहर जवंजाळ, रा.शेफअली पार्क, नवापूर यांना ताब्यात घेवून विचारले असता त्यांनी ट्रकांमध्ये दारू असल्याचे सांगितले. त्यांनी वाहने ही मुन्ना गामीत, रा.व्यारा (गुजरात) यांची असल्याचे सांगितले. दारू गुजरातमधील खेड्यांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचे सांगितले.पथकाने वाहनांची तपासणी केली असता पहिल्या वाहनात (क्रमांक एमएच ३९-सी १८८३) ६ लाख ९१ हजार ६०० रुपये किंमतीची देशी दारू आढळून आली. दुसºया वाहनात (क्रमांक जीजे २५-ए २२७२) १ लाख ४८ हजार २०० रुपये किंमतीची दारू तर तिसºया वाहनात (क्रमांक जीजे १९ एएफ ७१६२) ९६ हजार २०० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. एकुण दारू आणि तिन्ही वाहने मिळून २७ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी अशोक लोटन मराठे व अनिल जवंजाळ यांना ताब्यात घेण्यात आले असून फरार दोघांचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, हवालदार महेंद्र नगराळे, दादाभाऊ वाघ, शांतीलाल पाटील, जितेंद्र तोरवणे यांच्या पथकाने केली.नवापूर व व्यारा येथील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी आता एलसीबीला मेहनत घ्यावी लागणार आहे. नवापूर तालुक्यातील दारू किंग कोण याचाही शोध घेणे आवश्यक आहे.