सातपुडय़ात पायी प्रवासाचे नवे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 12:10 PM2019-09-17T12:10:31+5:302019-09-17T12:10:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अतिदुर्गम भागातील प्रमुख तीनपैकी दोन मार्गावर दरडी कोसळल्या व रस्त्याची दुरावस्था ...

New travel crisis in Satpudya | सातपुडय़ात पायी प्रवासाचे नवे संकट

सातपुडय़ात पायी प्रवासाचे नवे संकट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अतिदुर्गम भागातील प्रमुख तीनपैकी दोन मार्गावर दरडी कोसळल्या व रस्त्याची दुरावस्था झाली. त्यामुळे देवगोई व चांदसैलीमार्गे होणा:या बसफे:या परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आल्या असून सातपुडय़ातील नागरिकांवर पायी प्रवास व वाढीव भाडे आकारणीतून नवे संकट ओढवले आहे.  
मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत महाराष्ट्रातील काही जिल्हे प्रभावित झाले असून नुकसानीच्या दृष्टीने नंदुरबार जिल्हा चौथ्या स्थानी राहिला. त्यात रस्त्यांची दुरावस्था, घरांची पडझड व काही प्रमाणात जीवीत हानीही झाली. या नुकसानीत अतिदुर्गम भागातील सर्वाधिक रस्त्यांची दुरावस्था झाली. घरांची पडझड व जीवीत हानी वगळता नंदुरबार जिल्हा यंदाच्या संकटातून सावरु लागला असला तरी याला देवगोई व चांदसैली घाट अपवाद ठरत आहे. या घाटातील रस्त्यांची अपेक्षेनुसार दुरुस्ती झाली नसल्यामुळे  अतिदुर्गमवासीयांना अजुन या नैसर्गिक समस्येच्या रुपात नव्या  संकटाशी सामना करावा लागत आहे. 
एकटय़ा देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या, रस्ताही वाहून गेला. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी व धडगावची वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. काही प्रमाणात दुरुस्ती झाली असली तरी हे रस्ते मोठय़ा वाहतुकीसाठी प्रतिकुलच ठरत आहे. त्यामुळे 45 दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या अक्कलकुवा आगारामार्फत एखाद दोन नव्हे तर 15 बसफे:या तर याच मार्गावरुन जाणारी नंदुरबार आगाराची एक अशा एकुण 16 बसफे:या बंद करण्यात आल्या आहे. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश आहे. या पाठोपाठ तळोदा ते चांदसैली रस्ताही ठिकठिकाणी तुटल्यामुळे या मार्गाने सुरू असलेल्या मिनी बसच्या चारही बसफे:या नंदुरबार आगारामार्फत बंद करण्यात आल्या. दोन्ही आगारामार्फत 20 बसफे:या बंद असल्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने सातपुडय़ावर चांगलीच अवकृपा दाखविल्याचे म्हटले जात आहे. नैसर्गिक संकटाने तेथील नागरिकांवर पायी प्रवास व वाढीव भाडय़ाच्या माध्यमातून नाहक भरूदडही लादल्याचे दिसून येत आहे. 
दोन्ही घाटातील रस्त्यांची दुरुस्ती करुनही अपेक्षेनुसार दुरुस्ती झाली नसल्यामुळे त्यावरुन मोठी वाहतुक होऊ शकत नाही. बसफे:या बंद असल्याने दोन्ही मार्गावर केवळ खाजगी प्रवासी वाहतुक करणारी वाहनेच सुरू आहे. बंद बसफे:यांचा काही मार्गावरील खाजगी प्रवासी वाहनधारक फायदा घेत असल्याचे आढळून येत असून ही बाब तेथील नागरिकांसाठी खिशाला कात्री लावणारी ठरत आहे. या समस्येतून मुक्तीसाठी संबंधित यंत्रणेमार्फत या दोन्ही रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील नागरिकांमार्फत होत आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी हे गाव दुर्गम भागातील एक प्रमुख गाव असल्याचे म्हटले जात आहे. या गावाला मागील राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दत्तक घेतले होते. या गावाची महत्वाकांक्षा लक्षात अक्कलकुवा आगाराने देखील भगदरीर्पयत एक बस सुरू केली. परंतु रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे ही बसही बंद करण्यात आली आहे.

शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेणा:या अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील बहुसंख्य विद्याथ्र्याना परिवहन महामंडळामार्फत मासिक प्रवास पास देण्यात आले आहे. त्यात बहुसंख्य विद्याथ्र्याना अक्कलकुवा आगाराच्याच बसेस सोयीच्या होत्या. परंतु या आगाराच्या सर्वच बसेस बंद असल्यामुळे दोन्ही तालुक्यातील विद्याथ्र्याची गैरसोय होत आहे. शिवाय अपेक्षित त्या वेळेवर मिळत नाही. केवळ शहादामार्गे मोलगीर्पयत जाणा:या नवापूर आगाराच्या बसवरच विसंबून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या बहुमुल्य वेळेचा देखील अपव्यय होत आहे.
 

Web Title: New travel crisis in Satpudya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.