नेत्रंग-शेवाळी मार्ग दुरुस्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:24 IST2020-03-17T12:24:49+5:302020-03-17T12:24:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शेवाळी नेत्रंग महामार्गाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत ...

Netrang-Shewali road repairs started | नेत्रंग-शेवाळी मार्ग दुरुस्तीला सुरुवात

नेत्रंग-शेवाळी मार्ग दुरुस्तीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शेवाळी नेत्रंग महामार्गाची दुरवस्था झाली होती. त्यामुळे प्रवासी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता, त्यामुळे या महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको करण्यात आले. त्याची दखल घेत संबंधित विभागामार्फत रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
शेवाळी- नेत्रंग या महामार्गाची गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दुरवस्था झाली होती, मोठमोठे खड्डे पडले होते, वाहनधारकांना वाहन चालवतांना मोठी कसरत करावी लागत होती. अनेक दुचाकीस्वारांवर मणकेदुखी लादली गेली आहे. त्यामुळे हा महामार्ग जीवघेणा ठरत होता.
या मार्गावर रोज लहान-मोठे अपघात होत होते, असे असतांनाही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले होते. वेळोवेळी पाठपुरावा करुनही रस्ता दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये आक्रोश निर्माण झाला होता. जनहितासाठी भाजपाचे नागेश पाडवी यांच्या नेतृत्वाखाली वरखेडी नदीवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. भाजपामार्फत करण्यात आलेल्या आंदालनाची दखल घेत संबंधित विभागामार्फत या महामार्गावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. तर महामार्गाचे काम त्वरीत सुरू करावे अशी मागणीही करण्यात आली आहे. ही मान्यही झाली आहे, त्यानुसार कामाला सुरुवातही होणार आहे. त्यामुळे वाहनधारकांपाठोपाठ नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

Web Title: Netrang-Shewali road repairs started