नंदुरबार पालिकेचा १२१ कोटींचा अर्थसंकल्प राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:27 IST2021-02-15T04:27:46+5:302021-02-15T04:27:46+5:30

नंदुरबार : नंदुरबार पालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा १२१ कोटी ८६ लाख ८६ हजार ६८६ रुपयांचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता ...

Nandurbar Municipal Corporation will have a budget of 121 crores | नंदुरबार पालिकेचा १२१ कोटींचा अर्थसंकल्प राहणार

नंदुरबार पालिकेचा १२१ कोटींचा अर्थसंकल्प राहणार

नंदुरबार : नंदुरबार पालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा १२१ कोटी ८६ लाख ८६ हजार ६८६ रुपयांचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीत त्याला मंजुरी घेण्यात आली आहे. कोविड लसीकरणासाठी एक कोटी रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात नमूद करण्यात आली आहे.

कुठलीही दरवाढ व करवाढ नसलेला हा अर्थसंकल्प राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. १४ लाख ८६ हजार ६८६ रुपयांचे शिल्लक असलेला हा अर्थसंकल्प राहणार आहे. मोहल्ला क्लिनीक योजनेसाठी पाच लाख, डायलेसीस सेंटर व पॅथोलॅाजी लॅबसाठी १० लाख, नवीन अग्निशमन वाहन खरेदीसाठी एक कोटी, वृक्षारोपण व वनसंवर्धनासाठी १५ लाख, नवीन प्रशासकीय इमारत बांधकामासाठी पाच कोटी, प्रशासकीय कामकाजाकरिता साडेचार कोटी रुपयांची तरतूद यात राहणार असल्याचे पालिका सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Nandurbar Municipal Corporation will have a budget of 121 crores