खडकी येथे अल्पवयीन मुलीस पळवून लैंगिक अत्याचार, एकाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST2021-07-03T04:20:16+5:302021-07-03T04:20:16+5:30

पोलीस सूत्रांनुसार खडकी (ता. नवापूर) येथील एका १४ वर्षीय मुलीस विशाल विष्णू वळवी (रा. कोकणीपाडा, ता. नवापूर) याने ३० ...

A minor girl was abducted and sexually assaulted at Khadki | खडकी येथे अल्पवयीन मुलीस पळवून लैंगिक अत्याचार, एकाविरुद्ध गुन्हा

खडकी येथे अल्पवयीन मुलीस पळवून लैंगिक अत्याचार, एकाविरुद्ध गुन्हा

पोलीस सूत्रांनुसार खडकी (ता. नवापूर) येथील एका १४ वर्षीय मुलीस विशाल विष्णू वळवी (रा. कोकणीपाडा, ता. नवापूर) याने ३० जून रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खडकी येथून फूस लावून पळवून नेल्याबाबत विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, उपनिरीक्षक भूषण बैसाने यांनी तपास केला. कोकणीपाडा येथे विशाल ऊर्फ अजय विष्णू वळवी याने तिला पळवून नेल्याबाबत समजले. अपहृत मुलगी व संशयितास ताब्यात घेऊन मुलीचा महिला पोलीस अंमलदार यांच्यासमक्ष जबाब नोंदविण्यात आला. तसेच वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे प्राथमिक वैद्यकीय अहवाल प्राप्त झाला.

पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून विसरवाडी पोलीस ठाण्यात विशाल ऊर्फ अजय विष्णू वळवीविरुद्ध बलात्काराचा, अपहरणाचा तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयितास अटक करून न्यायालयात हजर केले. त्यास ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे हे करीत आहेत.

Web Title: A minor girl was abducted and sexually assaulted at Khadki