आरोग्य विभागाकडून उपाययोजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 12:34 IST2020-03-17T12:34:02+5:302020-03-17T12:34:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे एका बालकास डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याने तालुका आरोग्य विभागाकडून दुसऱ्या ...

Measures from the Department of Health | आरोग्य विभागाकडून उपाययोजना

आरोग्य विभागाकडून उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्क
रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी येथे एका बालकास डेंग्यूसदृष्य आजाराची लागण झाल्याने तालुका आरोग्य विभागाकडून दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर जलद ताप सर्वेक्षण तसेच कंटेनर सर्वेक्षण करण्यात येऊन डेंग्यूविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
रांझणी ग्रामपंचायतीकडूनही रविवारपासूनच गावात धुरळणी करण्यात येत आहे. तसेच रोजच्या रोज भांडी धुवून पाणी वापराबाबत आवाहन करण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र चव्हाण यांनी भेट देवून डेंग्यू, मलेरियाबाबत मार्गदर्शन करून आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्यासह शासकीय रूग्णालयातच डेंग्यूची चाचणी करण्याबाबत मार्गदर्शन केले.

रांझणी गावात सकाळपासूनच आरोग्य कर्मचारी दाखल होत असून त्यांच्याकडून गल्लोगल्ली जलद ताप सर्वेक्षण, कंटेनर सर्वे तसेच स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात येत होते. या वेळी कर्मचाऱ्यांचे ‘टीम वर्क’ पाहून रांझणीवासियांकडून कौतुकाची थाप मिळाली. गावात आरोग्य सहाय्यक ए.एफ. पाडवी, आरोग्य सेवक एम.जी. पिंजारी, आर.व्ही. माळकर, व्ही.आर. नरवाडे, एफ.डी. पावरा, पी.व्ही. धनगर, डी.एम. वळवी, एन.ए. पवार, सी.एम. वाघ, जे.सी. नाईक, एस.टी. वळवी, आरोग्यसेविका व्ही.ए. गरूड, ए.आर. गावीत, आशा गटप्रवर्तक ज्योती जाधव, आशा कार्यकर्ती मंगला मराठे, अनिता ठाकरे यांनी भेटी दिल्या.

Web Title: Measures from the Department of Health