शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात दोन गटात तुफान हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मागील भांडणाची कुरापत काढून शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री 11 ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : मागील भांडणाची कुरापत काढून शहरात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना रविवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली़ दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली होती़ घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद दिल्याने 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन 11 जणांना पोलीसांनी ताब्यात घेतल़े पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सप्तशृंगी मंदिराजवळील चौकात पिरण मोरे, धनराज ईशी, दिनेश निकुंभे, सचिन मोरे, अश्विन मोरे, गुड्ड ईशी, वैभव चव्हाण, अश्विन मोरे, कल्पेश ईशी, पंकज घोडसे, भूषण वाघमारे, शुभम चव्हाण, प्रकाश चव्हाण, विश्वजित भामरे, दिनेश निकुंभे, रवी मोरे सर्व रा़आंबेडकर चौक यांनी मागील भांडणाची कुरापत काढून कृष्णा गुलाब सोनवणे व नितीन चौधरी यांना लाठय़ा-काठय़ा व  लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती़ रात्री घडलेल्या या घटनेनंतर सर्व संशयितांविरोधात कृष्णा सोनवणे याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान रात्री उशिरा दुस:या गटातील बाबा वडर उर्फ कृष्णा गुलाब सोनवणे रा.साईबाबा नगर, निखिल चौधरी रा.लोणखेडा यांनी भांडणाची कुरापत काढून पिरण मोरे यास लाकडी दांडक्याने व फायटरने जबर मारहाण करीत  दुखापत केली़ शहरातील हॉटेल अनिल पॅलेसजवळ ही घटना घडली़ याप्रकरणी पिरण मोरे याच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास उपनिरीक्षक राजेश पाटील व विक्रांत कचरे करत आहेत़ मारहाणीदरम्यान एका गटाने दुस:या गटातील एकाची दुचाकीची तोडफोड करत पेटवून देण्याचा प्रयत्न केला होता़ पोलीस निरीक्षक किसनराव नजनराव पाटील यांनी रात्रभर गस्त संशयितांची धरपकड केली होती़ 

दोन्ही गटातील हाणामारी सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक भदाणे, सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांना मिळाल्यानंतर पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले होत़े त्यांनी दोन्ही गटांना समजावण्याचा प्रय} केला असता, पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली़ याबाबत पोलिस हेड कॉन्स्टेबल भरत बडगुजर यांच्या फिर्यादीवरुन  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलिसांनी धनराज ईशी, अश्विन मोरे, वैभव चव्हाण, पंकज घोडसे, भूषण वाघमारे, शुभम चव्हाण, प्रकाश चव्हाण, विश्वजित भामरे, कृष्णा सोनवणे व निखिल चौधरी यांना अटक केली होती़ सोमवारी त्यांची नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आह़े