वडझाकण येथे मका पिकाविषयी शेतीशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST2021-07-23T04:19:37+5:302021-07-23T04:19:37+5:30

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडळ कृषी अधिकारी आर.डी. वळवी यांच्या मार्गदर्शनखाली वडझाकण ...

Maize crop farm at Wadzhakan | वडझाकण येथे मका पिकाविषयी शेतीशाळा

वडझाकण येथे मका पिकाविषयी शेतीशाळा

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर, तालुका कृषी अधिकारी स्वप्नील शेळके, मंडळ कृषी अधिकारी आर.डी. वळवी यांच्या मार्गदर्शनखाली वडझाकण येथील जेरम्या गोम्या वळवी यांच्या शेतावर शेतकऱ्यांच्या शेतीशाळा व प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गात पर्यवेक्षक उमेश भदाणे यांनी मित्रकिडीबाबत मार्गदर्शन केले. कृषी सहायक गणेश पाटील यांनी मका पिकात रासायनिक खते देताना कोणती दक्षता घ्यावी याबाबत माहिती देऊन ह्युमिक ॲसिड घरच्या घरी कसे तयार करता येते याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषी सहायक प्रकाश अहिरे यांनी मका पिकावरील लष्करी अळी निरीक्षणाद्वारे अळीची ओळख व नुकसानीची माहिती देऊन त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. कृषी सहायक मनोज कोकणी यांनी जीवामृत घरच्या घरी कसे तयार करता येईल, त्याला लागणारे साहित्याबाबत व त्याचे फायदे पटवून दिले. स्नेहलकुमार पाडवी यांनी पाच टक्के निंबोळी अर्क तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच कोचऱ्या गिजा वळवी, रमण कामू वसावे, रामसिंग रुपा वळवी, दिनेश सुदाम वळवी व शेतकरी उपस्थित होते. आभार कृषी सहायक गणेश पाटील यांनी मानले.

Web Title: Maize crop farm at Wadzhakan