शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

वीज उपकेंद्राला आग लागून सात लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 13:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातील पोटेन्शियल ट्रान्सफार्मरला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्याला वीजपुरवठा करणाऱ्या १३२ के.व्ही. वीज उपकेंद्रातील पोटेन्शियल ट्रान्सफार्मरला शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा दोन तास खंडित झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली. या अग्नितांडवात वीज कंपनीचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले असून आग विझवल्यानंतर वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने काम करीत दोन तासात संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत केला.प्रकाशा रस्त्यावर शहादा शहरासह संपूर्ण तालुक्याला वीजपुरवठा करणारे १३२ के.व्ही. वीज उपकेंद्र आहे. याच केंद्रातून तळोदा, अक्कलकुवा, धडगाव येथे वीजपुरवठा केला जातो. शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास उपकेंद्रातील २२० के.व्ही.चे पोटेन्शियल ट्रान्सफार्मरला तांत्रिक दोषामुळे अचानक आग लागली. आग लागल्याचे वीज कंपनीच्या कर्मचाºयांच्या लक्षात येतात त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करून पालिकेच्या अग्निशमन दलाला आगीची माहिती दिल्यानंतर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले होते. आग लागल्यानंतर तात्काळ कर्मचाºयांनी शहरासह संपूर्ण तालुक्याला होणारा वीजपुरवठा बंद केल्यामुळे मोठी हानी टळली. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाºयांना यश आलेआगीचे रूप एवढे रौद्र होते की आगीच्या ज्वालांनी सुमारे एक किलोमीटरचा परिसर प्रकाशमय झाला होता. अगदी लांबून आगीच्या ज्वाला दिसत होत्या. संपूर्ण परिसरात धूर व आगीच्या ज्वाला यांचे थैमान सुरू होते. या अग्नीतांडवात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी वीज कंपनीचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.आगीवर नियंत्रण मिळाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाºयांनी मध्यरात्रीच्या सुमारास याच उपकेंद्रावरील दोंडाईचा ते शहादा या उच्च दाबाच्या दुसºया वाहिनीवर सर्कीट चेंज करून वीजपुरवठा सुरळीत केला. परिणामी पहाटे चार वाजेच्या सुमारास शहरासह संपूर्ण तालुक्याचा वीजपुरवठा सुरळीत झाला होता. या आगीत वीज कंपनीचे २२० के.व्ही.चे पोटेन्शियल ट्रान्सफार्मर पूर्णपणे जळून खाक झाले असून यात सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.वीज वितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीकांत पाटील, सचिन चित्ते, हेमंत माळी, हेड फोरमन एस.व्ही. कोळी, तंत्रज्ञ एस.आर. माळीच, एस.एस. सोनवणे, एस.एस. महाले, व्ही.एस. पाडवी, रूपाली राजपूत व कर्मचाºयांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रीच्या सुमारास शर्थीचे प्रयत्न केल्याने वीजपुरवठा सुरळीत झाला. घटनेची माहिती मिळताच वीज कंपनीचे अधिकारी व शहादा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. शहादा पोलिसात अग्नीउपद्रव घटनेची नोंद करण्यात आली आहे.