ज्ञानदिप सोसायटीत नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:56 AM2020-05-25T11:56:10+5:302020-05-25T11:56:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : धुळे रस्त्यावरील ज्ञानदिप सोसायटीत निम्मे भागात पाणी पुरवठ्याची समस्या लक्षात घेता नवीन पाईपलाईन मंजुर ...

Launch of new pipeline work at Gyandeep Society | ज्ञानदिप सोसायटीत नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

ज्ञानदिप सोसायटीत नवीन पाईपलाईन कामाचा शुभारंभ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : धुळे रस्त्यावरील ज्ञानदिप सोसायटीत निम्मे भागात पाणी पुरवठ्याची समस्या लक्षात घेता नवीन पाईपलाईन मंजुर करण्यात आली आहे. या कामाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला.
या भागातील वसाहतीचा विस्तार व उंचसखलपणा लक्षात घेता अनेक घरांना पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होत होती. त्यामुळे नवीन पाईपलाईन टाकावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याची दखल घेत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी नवीन पाईपलाईनला मंजुरी दिली. या कामाचे भुमिपूजन रविवारी उपनगराध्यक्षा भारती राजपूत यांच्या हस्ते व पाणी पुरवठा सभापती कैलास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी नंदुरबार बाजार समितीचे सभापती किशोर पाटील, अविनाश माळी, मोहितसिंग राजपूत, अभियंता कामडी, वाल्मिक मिस्तरी आदींसह वसाहतींमधील रहिवासी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सभापती कैलास पाटील यांनी सांगितले, नंदुरबार पालिकेतर्फे सर्व भागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा केला जात आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील शहरवासीयांना विनाअडथळा पाणी पुरवठा केला गेला.
ज्ञानदिप सोसायटीतील नागरिकांची मागणी लक्षात घेता नगराध्यक्षांनी तातडीने हे काम मंजूर केले. यामुळे या भागातील पाणी समस्या कायमची मिटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Launch of new pipeline work at Gyandeep Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.