हातपंप दुरूस्ती करूनही पाणी नसल्याने टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:55 PM2020-05-27T12:55:18+5:302020-05-27T12:55:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कललकुवा तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा येथील हातपंप नादुरूस्त असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच त्याची ग्रामपंचायत ...

Lack of water even after repairing hand pump | हातपंप दुरूस्ती करूनही पाणी नसल्याने टंचाई

हातपंप दुरूस्ती करूनही पाणी नसल्याने टंचाई

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाण्याविहीर : अक्कललकुवा तालुक्यातील चिखलीचा आसनबारीपाडा येथील हातपंप नादुरूस्त असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच त्याची ग्रामपंचायत व पाणीपुरवठा विभागाने दखल घेत आसनबारीपाडा येथील तिघा हातपंपाची दुरूस्ती करीत त्यात तीन पाईप वाढविले. परंतु त्यापैकी दोन हातपंपांना समाधान कारक पाणी लागले नसल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
तालुक्यातील चिखलीच्या आसनबारीपाडा येथे तीन हातपंप असून, एक नादुरुस्त तर दोन हातपंपाना हंडाभर पाणी जेमतेम लागले. परंतु या पाड्यावरील नागरिकांना पाण्यासाठी एक-दीड किलोमीटर भटकंती करीत हादो खाडीमध्ये तयार करण्यात आलेल्या झिऱ्यातून पाणी आणावे लागत आहे. तसेच गुरानादेखील पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच ग्रामपंचायत व पाणी पुरवठा विभागाने दखल घेत नादुरूस्त हातपंपाची पाहणी करून दुसºया दिवशी तिघा हातपंपाची दुरूस्ती करीत त्यात तीन पाईप वाढविले. मात्र समाधानकारक पाणी लागले नसल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Web Title: Lack of water even after repairing hand pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.