शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलियम पाईपलाईनवरुन आयओसी व शेतक:यांत जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 11:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईनचे सुरु असलेले काम रोखून तातडीने बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : केंद्र सरकारच्या पेट्रोलियम पाईप लाईनचे सुरु असलेले काम रोखून तातडीने बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष आऱसी़गावीत यांनी केला आह़े तर दुसरीकडे हे काम शासकीय स्तरावरील सर्व सोपस्कार पूर्ण करुन सुरु असल्याने ते रोखता येणार नाही असे कंपनीच्या अधिका:यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहिर केले आह़े            नवापुर तालुक्यातील शेतक:यांनी तहसीलदार सुनिता ज:हाड यांच्याकडे निवेदन देत पाईपलाईनचे काम बंद करण्यात यावे अशी मागणी केली होती़ यानंतरही इंडियन ऑइल कंपनीच्या अधिका:यांनी काम बंद न केल्याने शुक्रवारी शेतक:यांनी जागेवर जाऊन काम रोखले होते. याबाबत विद्यार्थी संघटनेनेही 3 नोव्हेंबर रोजी कंपनीचे सक्षम अधिका:यांना निवेदन दिले होत़े तसेच तालुक्यातून पेट्रोलियम पाईपलाईन साठी भूसंपादन होऊ देणार नाही असा पवित्रा शेतक:यांनी घेतला होता. ही पाईप लाईन इंडियन ऑईल कोपोर्रेशन लिमीटेड या शासन अंगीकृत व्यवसायासाठी आहे. हा केंद्रशासनाचा प्रकल्प असल्याचे सांगून शेतक:यांची फसवणूक करण्यात येत आह़े शेतक:यांसोबत चर्चा न करताच शेत जमिनी पेसांतर्गत संविधानाच्या पाचव्या सूचित नमुद सर्व प्रकारचे संरक्षण असलेल्या आदिवासींच्या आहेत़ त्या सूचीतील तरतुदी व पेसा कायद्याखालील तरतूदींचे उल्लंघन होत असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े कंपनीकडून  दादागीरी, दडपशाही व गुंडगिरीने बेकायदेशीर पणे पाईपलाईचे काम सुरु असल्याने व शासनाला निवेदने देऊनही काहीच उपयोग झाला नसल्याने काम बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेतक:यांचे म्हणणे आह़े याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करणार असल्याचे शेतक:यांनी सांगितले आह़े यावेळी नवापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीप गावीत, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आऱसी़गावीत, रमेश गावीत, वाशा गावीत, दिलीप गावीत, गेपु गावीत, जेमा गावीत, जयंत गावीत, वसंत गावीत, रॉबीन नाईक, समुवेल गावीत, वेच्या गावीत, नाथु गावीत, बाबु गावीत, गुलाब गावीत, विसु गावीत, विनायक गावीत, विजु गावीत, उखडय़ा गावीत, लखमा गावीत व रमेश गावीत आदी शेतकरी उपस्थित होते.

दरम्यान पेट्रोलियम पाईप लाईनची योजना देशाच्या प्रगती व राष्ट्रहितासाठी उपयुक्त आह़े हे काम न्यायालयीन प्रक्रियेच्या अधीन असुन शेतक:यांशी चर्चा करुन व त्यांना वाढीव असा मोबदला देऊन सुरु केले असल्याचा दावा इंडियन ऑइल कॉपोर्रेशन लिमिटेडचे वरिष्ठ प्रबंधक (निर्माण) प्रणव चौरसिया यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.चौरसिया यांनी सांगितले की, पाईप लाईन टाकल्यानंतरही जमिनीची मालकी शेतक:यांचीच राहणार असून सातबारामधून एक इंच जमिनही अधिग्रहीत केली जाणार नाही. जमिनीचा दिला जाणारा मोबदला रोड अथवा महामार्ग भूमीअधिग्रहण प्रमाणे दिला जातो तशी तुलना कदापि करु नये. काही शेतक:यांनी केलेले आरोप निराधार असून बाधित शेतक:यांसोबत प्रत्यक्ष करुन विश्वासात घेऊनच पाईप लाईन टाकण्याचे काम करण्यात येत आहे. विद्यार्थी संघटनेकडून हुकुमशाही व गुंडगिरीचे केलेले आरोप निराधार असुन पेट्रोलियम मिनरल पाईप लाईन कलम 1962 च्या नियमानुसार केले जात आहे. मोबदल्याबाबत शेतकरी समाधानी नसल्यास जिल्हा न्यायालयात जाऊ शकतात असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेत कंपनीचे प्रकल्प अभियंता लेख राज, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले सेवानिवृत्त अधिकारी विक्रम वळवी उपस्थित होते.

नवापूर तालुका आदिवासी बहुल तालुका असल्याने मोबदल्यासाठी विशेष लक्ष देण्यात आले असुन आजतागायत महाराष्ट्रात 11 तालुक्यांमधून जाणा:या पाईप लाईनसाठी सर्वाधिक मोबदला नवापूर तालुक्यातील शेतक:यांना दिल्याचा दावा इंडियन ऑईलचे प्रणव चौरसिया यांनी पत्रकापरिषदेत केला़ 4आयओसीच्या सक्षम अधिका:यांनी योग्य पाहणी करुन मोबदला निश्चित केला आह़े पीक, शेतातील झाडे यासाठी सर्वात उच्च मोबदला दर निश्चित केला असून शेतक:यांना जास्तीत जास्त फायदा होईल याचा विचार करण्यात आला आह़े कंपनीकडून पाईपलाईन टाकल्या नंतर जमीन पूर्ववत करुन शेतक:यांना पुन्हा त्या क्षेत्रात शेती करता येईल अशी माहिती इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या अधिका:यांनी दिली आह़े