पोषण अभियानांतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 11:53 IST2019-12-18T11:53:46+5:302019-12-18T11:53:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ,पोषण अभियान अंतर्गत, जिल्हा ...

Inauguration of a workshop under the nutrition campaign | पोषण अभियानांतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन

पोषण अभियानांतर्गत कार्यशाळेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या महिला बालविकास विभागातर्फे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ,पोषण अभियान अंतर्गत, जिल्हा संसाधन गटाचे प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवारी करण्यात आले़ यांतर्गत अधिकारी, पर्यवेक्षक, अंगणवाडी कर्मचारी यांना मार्गदर्शन करण्यात आले़
जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ.नितीन बोडके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी व तज्ञ प्रशिक्षक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले़ कार्यशाळेत बाल विकास प्रकल्प अधिकारी रनाळा व तळोदा यांनी मोहाली (पंजाब) एक महिन्याच्या पायाभूत प्रशिक्षणाची दिली़ यावेळी अशक्त नवजात बालकाची देखभाल या विषयावर बाल विकास प्रकल्प अधिकारी रणजित कुºहे यांनी मार्गदर्शन केले़ स्वस्थ भारत प्रेरक क्षितीज मलाणी, जिल्हा समन्वयक दिलीप सोनावणे व जिल्हा सहाय्यक विजय गिरासे, सुजीत इंगवले यांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यशाळेचा समारोप बुधवारी होणार आहे़

Web Title: Inauguration of a workshop under the nutrition campaign