अवैध मद्य नेणा:या कारने तिघांना उडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:19 PM2019-09-18T12:19:48+5:302019-09-18T12:20:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या  वाहनाला हुलकावणी देणा:या कारने दोन दुचाकींना उडविले घटना खापर-ब्राम्हणगाव रस्त्यावर ...

Illegal Alcohol: This car blew up all three | अवैध मद्य नेणा:या कारने तिघांना उडविले

अवैध मद्य नेणा:या कारने तिघांना उडविले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
खापर : उत्पादन शुल्क विभाग पथकाच्या  वाहनाला हुलकावणी देणा:या कारने दोन दुचाकींना उडविले घटना खापर-ब्राम्हणगाव रस्त्यावर घडली. त्यात तीन जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. कार चालकाला अटक करण्यात आली आहे. 
भरोसा नगीन मोरे, रा.लोणखेडा, ता.शहादा असे चालकाचे नाव आहे.          आशिष रमेशचंद जैन, बिनाबेन आशिष जैन व संदीप विजय ठाकरे असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. नंदुरबार उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचण्यात आला. सकाळी नऊ वाजता संशयीत कारचा  तळोदा येथून पथकाने खाजगी वाहनाने पाठलाग केला होता. ते वाहन त्यांना कोराई चौफुलीजवळ आढळून आले वाहनधारकाने त्यांना हुलकावणी देऊन ब्राrाणगाव रस्त्यावर वाहन भरधाव नेले असता बसस्थानक परिसरात दोन मोटारसायकल वर असलेल्या तिघांना जोरदार धडक दिली. त्यानंतर  देऊन ब्राम्हणंगाव गावाजवळ गाडीत असणारे दारूचे खोके शेतात फेकुन देऊन वाहन रस्त्यावर सोडून पळून जात असतांना खापर येथील युवक पोलीस कर्मचारी व उत्पादन शुल्क च्या पथकाने पाठलाग करून वाहनचालकांस ताब्यात घेतले आहे. सकाळच्या रहदारीच्या वेळेत भरधाव वाहनांच्या पाठलाग होतांनाचा प्रसंग खापर गावात दिवसभर चर्चेचा विषय होता. सध्या गुजरातमध्ये महाराष्ट्रातून दररोज महागड्या कार मधुन अवैध दारुची वाहतुक होत आहे. त्यामुळे अवैध मद्य सम्राटांच्या मुसक्या आळविण्याची मागणी होत आहे.
पोलिसांनी वाहनचालक भरोसा नगीन मोरे रा.लोणखेडा ता.शहादा यांस ताब्यात घेतले असून अक्कलकुवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार शिरसाठ करीत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या भागात अवैध मद्य वाहतूक करणारे सरसावले आहेत. गुजरातच्या सिमेवर विशेषत: ग्रामिण भागातील रस्त्यांवरून अशी वाहतूक केली जात आहे. त्यात अलिशान वाहनांचा देखील समावेश आहे. अपघातात दोन युवक व महिला जखमी झाले. 
 

Web Title: Illegal Alcohol: This car blew up all three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.