शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मनोहारी धबधबा विकासाला पारखा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:55 IST

शरद पाडवी ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : थंड हवेच्या तोरणमाळ  येथील सिताखाईच्या प्रसिद्ध धबधब्याशिवाय सातपुडय़ात हातधुई ता. धडगाव ...

शरद पाडवी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : थंड हवेच्या तोरणमाळ  येथील सिताखाईच्या प्रसिद्ध धबधब्याशिवाय सातपुडय़ात हातधुई ता. धडगाव येथील ‘दवोअं काट’ या घाटातील धबधबा देखील पर्यटकांच्या दृष्टीने मने हिरावणारा ठरत आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या धबधब्याकडे अद्याप पर्यटन विभागाने लक्ष दिले नाही. त्यामुळे निसर्ग संपन्न असून त्याचा विकास होऊ शकला नसल्याची खंत सातपुडय़ातील नागरिकांना होत आहे.देशाच्या मध्यभागातून पसरलेल्या सातपुडा पर्वतात नंदुरबार जिल्ह्याचा देखील बहुतांश भाग येतो. जिल्ह्याच्या या भागात ठिकठिकाणी पर्यटकांना खुणावणारी स्थळे आहेत. त्यात तोरणमाळ हे महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असून तेथे प्रत्येक टेकडय़ा, नदी, नाले, घाट व रस्ते देखील पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत यात शंका नाहीच. परंतु सातपुडय़ात तोरणमाळशिवाय अन्य ठिकाण देखील थंड हवेचे व आकर्षकही आहेत. या अन्य ¨ठकाणांचा अद्याप कुठलाही विकास झाला नाही. खरे तर पर्यटन विकास विभागामार्फत या ठिकाणांकडे लक्ष दिले गेले नाही. परिणामी निसर्गसंपन्न असूनही पर्यटनाच्या दृष्टीने हा भाग उपेक्षित राहिला आहे. सातपुडय़ाचाच एक अविभाज्य घटक असलेल्या हातधुई येथेही दोन आकर्षक धबधबे आहेत. दोन्ही धबधबे हे हातधुई व टेंबला येथील नाल्यांमुळे तयार झाले आहेत. दोन्ही घटातील खडक हे विशिष्ट प्रकारचे असल्यामुळे घाटाची कुठलीही क्षती होत नाही. खोल द:या असल्यामुळे वरुन पडणा:या पाण्यातून मधुर आवाज निघत असून त्याच आवाजाचा प्रतिध्वनी देखील येत असल्याने तेथे जाणा:या प्रत्येक व्यक्ती मनोमन निसर्गाच्या सानिध्यात हरवतो. कुठलाही कृत्रिम आवाज नसूल्याने गोंगाटाचा तेथे प्रश्नच उद्भवत नाही. केवळ तेथे पक्ष्यांचा आवाज अन् कोसळणा:या पाण्याचा ध्वनी-प्रतिध्वनीच कानावर पडतो.या ठिकाणी घनदाट जंगल असून विविध आयुर्वेदिक तथा औषधी वनस्पती देखील आढळून येत आहे. या वनस्पती अनेक गांभीर आजारांवर गुणकारी असल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येते. या वनस्पतींच्या संवर्धनासाठी शासनाच्या कुठल्याही यंत्रणेने पुढकार घेतला नाही. या धबधब्यांचा विकास तर दूरच, तेथे पोहोचण्यासाठी कुठलेही रस्ते तयार करण्यात आली नसल्याने नागरिकांमधून खंत व्यक्त करण्यात येत आहे. सद्यस्थितीत वाढत्या स्पर्धा व जबाबदा:यांमुळे विविध घटकातील बांधवांमध्ये ताण-तणाव वाढला आहे. हा ताण-तणाव घालवण्यासाठी समाजबांधव निसर्ग सुंदर ठिकाणांचा शोध घेत आहेत. हा शोध हातधुई येथील धबधबा, घाट व घनदाट जंगल पूर्ण करणारे ठरू शकतात. या घटांर्पयत जाण्यासाठी कुंडल, खुंटामोडी येथे उतरुन पायी जावे लागते. तर खर्डामार्गे हातधुई गावातूनही जाता येते. त्यामुळे या ठिकाणांचा विकास होणे अत्यावश्यक आहे. पर्यायाने त्यातून स्थानिकांना देखील काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी पर्यटन विकास विभागाकडून सातपुडय़ातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहे. 

मोठय़ा धबधब्याच्या घाटावर हातधुई गावाचे देवस्थान आहे. तेथे वाघदेव, निली चाराय अशा काही निसर्गपूजा वर्षानुवर्षे होत आला आहे. त्यामुळे या घाटाला देवोअंकाट असे म्हटले गेले आहेत. तर दुस:या धबधब्याच्या घाटाला पूतीइ काट म्हणून तेथील भाषेत संबोधले जात आहे. घाट असलेली जागा घनदाट जंगलाची असली तरी हे वनक्षेत्र नसल्याचे तेथील नागरिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या क्षेत्राचा काही भाग आदिवासी विकास विागाच्या शासकीय आश्रमशाळेच्या अखत्यारित येतो, तर काही भाग टेंबला येथील पारत्या हांद्या तडवी व हातधुई येथील गुज:या हनुमान वळवी यांचा असल्याचे वर्तविण्यात येत आहे.