शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

शेहीनजीक ट्रॅक्टर अपघातात आई-लेक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:37 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी :   नवापूर तालुक्यातील शेही ते मरोड रस्त्यादरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये ...

 लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी :   नवापूर तालुक्यातील शेही ते मरोड रस्त्यादरम्यान भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरचे चाक रस्त्यावरील खड्ड्यामध्ये आदळले. यावेळी ट्रॅक्टरमधील मुलगी व तिची आई ट्रॅक्टरमधून खाली जोरात फेकल्या गेल्याने या अपघातात त्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. यामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.पोलीस सूत्रानुसार, शेही गावाहून देवमोगरा येथे आकाश हिरालाल वसावे हा त्याची पत्नी योगीता आकाश वसावे (२३) व मुलगी प्रणवी आकाश वसावे (४) (सर्व रा.देवमोगरा) यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून देवमोगरा या गावी घेऊन जात होता. भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवत असताना शेही ते मरोड गावाच्या दरम्यान ट्रॅक्टरचे चाक एका खड्ड्यात आदळले. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेली त्याची पत्नी योगीता वसावे व मुलगी प्रणवी वसावे ह्या ट्रॅक्टरवरुन रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. या अपघातात दोघी जागीच ठार झाल्या. याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात राजू भरत वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक आकाश हिरालाल वसावे याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवलदार नरेंद्र वळवी करीत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून दररोज लहान-मोठे अपघात होत असतात.   त्यात अनेकांनी आपले प्राण गमावले असून अनेकांना  अपंगत्व आलेले      आहे. संबंधित विभागाने ग्रामीण भागातील रस्त्यांकडे लक्ष देऊन ते दुरुस्त करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.