शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ कुटुंबांना गाव बंदी बरोबरच जिल्हा बंदीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. शेतमालक व एक-दोन व्यक्ती व्यतिरिक्त या कुटुंबांना अजून कोणाचीच मदत मिळाली नाही. एवढेच नव्हे शासनाच्या मदतीपासूनदेखील ते उपेक्षित आहे. निदान शासनाने तरी आम्हाला मदतीचा हात द्यावा अथवा आमच्या गावाकडे जाऊ द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळ कुटुंबे दरवर्षी दिवाळीनंतर मेंढपाळ कुटुंबे स्थलांतर करीत असतात. तब्बल पाच ते सहा महिने ते इकडेच राहत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते पुन्हा आपल्या गावाकडे जात असतात. यंदाही नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शनिमांडळ, रनाळा, निजामपूर, निसर्डे येथील साधारण ५० कुटुंबे तळोदा तालुक्यातील चिनोदा, भवर, प्रतापपूर, सिलींगपूर, करडे, काजीपूर, तलावडी, जावदा या गावांमधील शेत शिवारात स्थलांतरीत झाले आहे. सद्या कोरोना या महामारीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. साहजिकच ग्रामीण भागातही त्याची दहशत पसरली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावातील गावकरी आपल्या गावाच्या सीमादेखील बंद करू लागले आहेत. तथापि जिल्हा बंदीबरोबरच गाव बंदीचा फटका मेंढपाळ कुटुंबांनादेखील बसत आहेत. कारण शेत शिवारातून गावात किराणा अथवा दळण दळण्यासाठी येवू शकत नाही. परिणामी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याची व्यथाही या कुटुंबांनी बोलून दाखविली आहे. एवढेच नव्हे शासनाची अथवा स्वयंसेवी संस्थांची मदत अजून पोहोचली नसल्याचे ते म्हणतात. एकीकडे कुणीही अन्नापासून उपाशी राहणार नाही असे सरकार म्हणते. मात्र दोन वेळच्या जेवणासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आमच्या कुटुंबासोबत आमची लहान बालकेदेखील आहेत.या बंदीमुळे त्यांना वेळेवर जेवण देऊ शकत नाही, असेही ते सांगतात. वास्तविक आमचे संपूर्ण आयुष्यच भटकंतीचे असते. त्यामुळे शासनाच्या योजनेशिवाय जीवन जगत असतो. निदान महामारी सारख्या नैसर्गिक आपत्तीत तरी शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनानेच कानावर हात ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासनाने आम्हाला रेशन द्यावे, अन्यथा आम्हाला आमच्या गावाकडे स्थलांतरीत करू द्यावे, अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपसातील संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय असल्यामुळे ही कुटुंबेदेखील एकमेकांपासून इतरत्र विखुरले आहेत. काही कुटुंबे तर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या कुटुंबांना काही शेतमालक थोड्याफार प्रमाणात जीवनावश्यक वस्तु देत आहेत. आमलाड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामराव आघाडे व तेथील ग्रामसेवक चुडामण सरगर यांनी काही काही कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीटे आदी वस्तुंचे वाटप केले होते. त्यांच्याकडे सद्या थोडेफार धान्य असले तरी गावबंदीमुळे दळणाचा प्रश्न आहे. निदान त्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे त्यांचे म्हणणे आहे.मेंढ्या चारण्यासाठी साक्री तालुक्यातील निसर्डे येथून तळोदा तालुक्यातील शेत शिवारात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कुणीच गावात येवू देई ना साहजिकच किराणा अथवा दळण दळण्याची समस्या उभी राहिली असून, यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. निदान शासनाने तरी रेशन बरोबरच आवश्यक वस्तु उपलब्ध करून द्याव्यात.-गढवर करे, मेंढपाळ, निसर्डे, ता.साक्री