शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारसह परिसरात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर  नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अनेक दिवसांच्या खंडानंतर  नंदुरबार, शहादा तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. साधारणत: अर्धा ते एक तास चाललेल्या या पावसामुळे नंदुरबारातील अनेक भाग जलमय झाले. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपात आणि परिसरात पाणी साचल्याने मंडळ कार्यकत्र्याची एकच धावपळ उडाली. शेतांमध्ये देखील पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप आले. जिल्ह्यात जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पावसाची संततधार होती. या काळात तीन वेळा अतिवृष्टीची नोंद देखील करण्यात आली होती. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच धरणे, लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. पाच तालुक्यांमधील पावसाची सरासरी देखील 100 टक्केपेक्षा अधीक गेली आहे. सर्वत्र समाधानकारक स्थिती आहे. पावसाने गेल्या दोन ते तीन आठवडय़ांपासून विश्रांती घेतल्याने शेती कामांना वेग आला होता. आता परतीच्या पावसाची प्रतिक्षा लागून असतांना बुधवारी रात्री व गुरूवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी रात्री शहादा तालुक्यातील तापी पट्टय़ात मुसळधार पाऊस झाला. गुरुवारी आद्रतेत वाढ झाल्याने उकाडय़ाने हैराण केले होते. सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. साधारणत: अर्धा ते एक तास मुसळधार पाऊस सुरू होता.गणपती मंडपांमध्ये पाणीनंदुरबारातील अनेक भागातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांमध्ये पाणी घुसले होते. काही ठिकाणी पाण्याचा निचरा होण्याची जागा नसल्यामुळे मंडप व परिसरात पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी मंडळ कार्यकत्र्याची कसरत होत होती. काही मंडळांच्या आरास आणि सुशोभिकरणाचे नुकसान झाले. मंडपांचे देखील नुकसान झाले. त्यामुळे काही मंडळांनी गुरुवारी रात्री आरास बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. शेतांमध्ये पाणीमुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पाणी साचले होते. यामुळे शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. गेल्या दोन ते तीन आठवडय़ात शेतक:यांनी शेतीची मशागत केली होती. काही ठिकाणी मका, मूग, चवळी काढणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या कामावरही परिणाम झाल्याचे दिसून आले. रस्त्यांची पुन्हा दैनागणेशोत्सवाच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारातील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली होती. आजच्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांची पुन्हा दैना झाली आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने दुचाकी व तीन चाकी वाहने बंद पडत होती. त्यामुळे वाहनचालकांची मोठी कसरत झाल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसून येत होते. 

सारंगखेडा  परिसरात बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे दीड तास झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचून पिके पुन्हा पाण्याखाली आली आहेत. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होत नाही तोच बुधवारी रात्री पुन्हा जोरदार पाऊस झाला. या पावसाचे पाणी शेतांमध्ये मोठय़ा प्रमाणावर साचल्याने पिकांचे नुकसान होणार असून बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. परिसरातील कु:हावद, कौठळ, बिलाडी, अनरद, पुसनद, सारंगखेडा, टेंभा, देऊर, कळंबू, बामखेडा त.सा. आदी भागात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे.