आरोग्यसेविकेच्या कारच्या काचा फोडल्या

By Admin | Updated: April 8, 2017 17:04 IST2017-04-08T17:04:25+5:302017-04-08T17:04:25+5:30

या प्रकरणी अज्ञाताविरोध पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े

The health workers' car was blown up | आरोग्यसेविकेच्या कारच्या काचा फोडल्या

आरोग्यसेविकेच्या कारच्या काचा फोडल्या

रांझणी, जि. नंदुरबार, दि. 8 : मोहिदा ता़ तळोदा येथे मध्यरात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने आरोग्यसेविका स्नेहल रवींद्र सूर्यवंशी यांच्या कारच्या काचा फोडल्या. या प्रकरणी अज्ञाताविरोध पोलिसात तक्रार देण्यात आली आह़े
 मोहिदा प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका  स्नेहल सूर्यवंशी यांनी   आपल्या मालकीची कार (एम़एच़ 18 7119) उपकेंद्रासमोरील  लावलेली होती. त्यावेळी रात्री बारा वाजेच्या सुरमारास अज्ञात व्यक्तीने कारच्या पुढचा काच फोडला गाडीतील महत्वाचे भाग काढून तो पोबारा केला. यामुळे चोरीच्या उद्देशाने गाडीचे काच फोडण्यात आला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आह़े  

Web Title: The health workers' car was blown up