सातपुडा साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:15+5:302021-02-14T04:29:15+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. यावेळी माजी संचालक रामजी धनजी पाटील, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योती पाटील, ग्रामपंचायत, ...

Health check-up camp at Satpuda Sugar Factory | सातपुडा साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर

सातपुडा साखर कारखान्यात आरोग्य तपासणी शिबिर

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातपुडा कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील होते. यावेळी माजी संचालक रामजी धनजी पाटील, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच ज्योती पाटील, ग्रामपंचायत, पुरुषोत्तमनगर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.तुकाराम गावित, डॉ.तुषार मोरे, डॉ.तोफिय काजी, डॉ.रेखा नाईक, डॉ.सागर नेरकर, किशोर खैरनार, वैशाली गडरी, अनिता मालुसरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, सेक्रेटरी सी.जी. पाटील, जनरल मॅनेजर अशोक पाटील, चिफ इंजिनिअर संजय चौधरी, अकाउंट मॅनेजर मिलिंद पटेल, संपर्क अधिकारी प्रवीण पाटील व विविध प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माता, आरोग्य कर्मचारी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी दीपक पाटील म्हणाले की, आरोग्याची तपासणी करणे ही काळाची गरज असून, तुमच्या कुटुंबासहीत आरोग्याची तपासणी शिबिराचे आयोजन म्हणजे पर्वणी असल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याचे कार्यकारी संचालक व डॉ.तुषार मोरे यांनी रुग्णसेवा व कामगारांना देण्यात येणाऱ्या सेवांबाबत पी.आर. पाटील यांनी सर्व डॉक्टरांचे कौतुक केले. सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.

Web Title: Health check-up camp at Satpuda Sugar Factory