शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
4
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
5
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
6
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
7
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
8
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
9
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
10
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
11
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
12
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
13
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
14
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
15
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
16
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
17
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
18
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
19
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
20
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून सुटला आणि चोरीच्या गुन्ह्यात पुन्हा पोलीसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 16:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केवळ चारच तासात पुन्हा बेड्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी केवळ चारच तासात पुन्हा बेड्या ठोकल्याची घटना ३ जानेवारी रोजी घडली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताने यापूर्वी चोरीचे २० गुन्हे केले असून, यातील एका गुन्ह्यात शिक्षा भोगून तो शहरात परतला होता. संतोष दिलीप तिजवीज, रा. बाहेरपुरा असे संशयिताचे नाव आहे. २ जानेवारी रोजी मध्यरात्री नंदुरबार शहरातील मंगळ बाजारात टिलूमल वेडूमल या किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत ५८ हजार रुपयांचा किराणा माल लंपास केल्याचे ३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आले होते. मंगळ बाजारात झालेल्या या चोरीच्या घटनेनंतर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी पथकाची नियुक्ती करत चाैकशी सुरू केली होती. दरम्यान, जेलमधून नुकत्याच सुटून आलेल्या संतोष तिजवीज याच्यावर पथकाने पाळत ठेवली असता, त्यानेच चोरी केल्याचे स्पष्ट झाले होते. दरम्यान, पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेतले असता, त्याने खोटे बोलून उडवाउडवीची उत्तरे दिली होती. एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजपूत यांनी त्याची चाैकशी केल्यानंतर संतोष याने मंगळ बाजारात चोरी केल्याचे कबूल करत शहरातील सिटी पार्क भागात लपवून ठेवलेला ५८ हजार रुपयांचा किराणा माल काढून दिला. संतोष तिजवीज हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर नंदुरबार शहर व इतर पोलीस ठाण्यांमध्ये २० गुन्हे दाखल करण्यात आहेत. यातील एका गुन्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तो जेलमध्ये होता. जेलमधून सुटून परत आल्यानंतर काही तासात त्याने मंगळ बाजारातील दुकान फोडले होते. त्यानंतर अवघ्या चारच तासात मात्र त्याला बेड्या पडल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित व अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासूळ, पोलीस शिपाई अभय राजपूत, यशोदीप ओगले यांनी केली.