शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

वेगवेगळ्या घटनेत जिल्ह्यात दोन विवाहितांचा छळ, गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहितांचा छळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहादा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहितांचा छळ झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शहादा व नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिली घटना मंदाणे येथील माहेर असलेल्या विवाहितेबाबत घडली. प्रियंका बाळकृष्ण बागुल या महिलेचा बाळकृष्ण दगा बागुल, रा.बडोदा यांच्याशी विवाह झाला होता. विवाह झाल्यापासून अर्थात दोन वर्षांपासून प्रियंका यांचा छळ केला जात होता. आपल्या आर्थिक व सामाजिक पातळीचे कुटुंब नाही, अशा कुटुंबातील मुलगी केल्याने आम्हाला शोभत नाही म्हणून छळ केला जात होता. बडोदा येथे सासरी व मंदाणे येथे माहेरीदेखील छळ सुरूच होता. त्या छळाला कंटाळून प्रियंका यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून बाळकृष्ण बागुुल, सखुबाई दगा बागुल, नीता विजय सोनवणे, विजय सुभाष सोनवणे, किरण दगा बागुल सर्व रा.बडोदा यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार काळूराम चौरे करीत आहे.

दुसरी घटना नंदुरबारातील परदेशीपुरा भागात घडली. नीलम संदीपकुमार मिश्रा या महिलेचा अहमदाबाद येथील संदीपकुमार जयप्रकाश मिश्रा यांच्याशी विवाह झाला होता. विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तसेच डॉक्टरांनी कानाचे ऑपरेशन सांगितल्याचा राग येऊन नीलम यांचा छळ करण्यात येत होता. त्या छळाला कंटाळून त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून संदीपकुमार जयप्रकाश मिश्रा, जयप्रकाश मिश्रा, मनिलाल मिश्रा, सरोजिनी जयप्रकाश मिश्रा, खुशबू जयप्रकाश मिश्रा, शांतीलाल मिलाल मिश्रा, विजयप्रकाश मणिलाल मिश्रा, वेदप्रकाश मणिलाल मिश्रा, शिवप्रकाश मणिलाल मिश्रा सर्व रा. अहमदाबाद व ग्रिष्मा अशोक दुबे, अशोक रघुनाथ दुबे, ममता संजय पांडे, रा. उत्तर प्रदेश यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार ठाकरे करीत आहे.