शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गांधी घराघरार्पयत पोहचावा- कुसुमबेन शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 12:35 IST

संडे स्पेशल मुलाखत --------------- महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान आणि दिल्लीत गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेअंतर्गत जनप्रबोधन आणि समाज कार्याची विविध कार्य सुरू आहेत. म.गांधी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या चरखा सेवेने अनेक महिलांना सक्षम केले आहे.

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कबडोदा येथील गंगानाथ विद्यालय हे क्रांतीकारकांचा अड्डा होता. त्याच ठिकाणी आचार्य काकासाहेब कालेलकर यांचेही कार्य सुरू होते. परंतु म.गांधी यांच्या ते संपर्कात आले आणि अहिंसेच्या मार्गावर या आंदोलनात सहभागी झाले. काकासाहेबांसोबत देशभर प्रवास करता आला. काकासाहेबांनीच स्थापन केलेल्या गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेचे काम दिल्ली येथील राजघाटावर आपण 50 वर्षापासून सांभाळत असून त्यातून आपल्या आयुष्याला वेगळीच झळाळी मिळाल्याची भावना या सभेच्या अध्यक्षा कुसुमबेन शहा यांनी व्यक्त केली. प्रश्न : गांधी हिंदुस्थानी साहित्य सभेची वाटचाल कशी सुरू आहे?उत्तर : आचार्य काकासाहेब कालेलकर यांनी 1942 मध्ये सुरुवातीला हिंदुस्थानी प्रचार सभा अशी संस्था स्थापन केली. देशाच्या स्वातंत्र्यानंतर या सभेसाठी पंडित नेहरू यांनी राजघाटावर गांधींच्या समाधीच्या परिसरात संस्थेला जागा दिली आणि तेथेच या संस्थेचे काम आजवर सुरू आहे. पुढे हीच संस्था गांधी हिंदुस्थानी साहित्य सभा म्हणून नावारुपास आली. या संस्थेतर्फे कला, साहित्य क्षेत्रातील काम व्यापक स्तरावर सुरू आहे. गांधींनी खेडय़ाकडे चला असे म्हटले होते. त्याच मार्गावर ग्रामिण भागात गांधी विचार पोहचविण्यासाठी प्रय} सुरू आहेत. संस्थेतर्फे विचार प्रसारासाठी 26 जानेवारी 1950 पासून मंगलप्रभात हे मासिकही सुरू आहे. प्रश्न : संस्थेतर्फे सध्या कुठले उपक्रम राबविले जात आहेत? उत्तर : संस्थेच्या दिल्ली कार्यालयात रोज सकाळी सात वाजता गांधी विचार प्रार्थनेपासून दिवसाला सुरुवात होते. ती रात्री नऊ वाजेर्पयत विविध कार्यक्रमांनी सुरू असते. विशेषत: शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण, महिलांना स्वावलंबनासाठी  शिलाई मशीनचे प्रशिक्षण, चरखा सेवा, संगीत वर्ग, निसर्गोपचारबाबत मार्गदर्शन यासह अनेक कार्यक्रम सुरू आहेत. ‘बापूने कहा था’ हे नाटक गावागावार्पयत नेण्यासाठी प्रय} सुरू आहेत. 

नंदुरबारलाही केंद्र सुरूआपण 30 वर्षापूर्वी नंदुरबारात एका विवाह सोहळ्याला आली होती. त्यावेळी या भागातील लोकांशी भेटल्यानंतर येथेही सहयोग लाभल्याने आचार्य काकासाहेब कालेलकर केंद्र सुरू आहे. या ठिकाणीही नित्यनियमाने चरखा सेवा याच्यासह महिलांसाठी, बालकांसाठी विविध उपक्रम सुरू असून ते सामाजिक अंगाने परिणामकारक ठरत आहे. 

चार राज्यात संस्थेचे केंद्रदिल्लीसह राजस्थान, कर्नाटक आणि महाराष्ट्र या संस्थेचे केंद्र सुरू आहेत. विशेषत: राजस्थानमध्ये बडगाव (बुंदी) येथे जलसंधारण क्षेत्रातील व्यापक स्वरूपाचे काम उभे झाले आहे. कर्नाटकमध्येही बेळगाव जवळ काकासाहेब शिक्षण निधी नावाने काम सुरू आहे. म.गांधी यांचे विचार गावागावात आणि घराघरार्पयत पोहचविण्यासाठी संस्थेचे प्रय} सुरू असल्याचे कुसूमबेन शहा यांनी सांगितले.