शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात पाच तर अक्कलकुव्यात एकाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2020 16:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ सकाळी दोघांचे तर रात्री उशिरा चार जणांचे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे़ सकाळी दोघांचे तर रात्री उशिरा चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत़ यात पाच शहादा तर एक बाधित अक्कलकुवा येथील आहे़ रुग्ण संख्येत वाढ झाल्याने नंदुरबार जिल्हा रेड झोनमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़मंगळवारी सकाळी धुळे येथून ५३ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ यात ५१ नेगेटिव्ह तर शहादा येथील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आलेली १५ वर्षीय मुलगी तर अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ५८ वर्षीय चालक यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते़ दिवसभर याची चर्चा असताना रात्री उशिरा धुळे येथून ५२ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला होता़ यातील शहादा शहरातील एकाच कुटूंबातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह तर ४८ स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत़ शहाद्यातील चौघांना कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यात बाधितांची संख्या आता १७ झाली आहे़ बाधितांमध्ये ४४, ४८ आणि ६५ वर्षीय पुरुष आणि १२ वर्षांच्या मुलीचा समावेश आहे़ त्यांना आयसोयलेशन वॉर्डात दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे़दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु झाला आहे़ शहाद्यातील कोरोनाची बाधा १५ वर्षीय मुलीला यापूर्वीच जिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात आले आहे़ तर आरोग्य विभागाच्या अँब्युलन्स चालकालाही मंगळवारी अक्कलकुवा येथून नंदुरबार येथील आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले़ अँब्युलन्स चालकाने कोरोनाबाधित महिलेला जिल्हा रुग्णालयात आणले होते़ यातून त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे़ त्यांच्या संपर्कात तब्बल २४ लोक आले आहेत़ त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे़ शहादा येथील युवतीच्या संपर्कातील सहा जण आधीपासून क्वारंटाईन आहेत़