शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावणाऱ्यास दिली पाच दिवस कैदची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नवापूर येथील जहागीर उस्मान मिर्झा रा.नवापूर याला नवापूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नवापूर येथील जहागीर उस्मान मिर्झा रा.नवापूर याला नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.नवापुरातील लाईट बाजार भागात ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास्क न लावता फिरत होता. त्याला पोलिसांनी अडविले असता त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल अशा पद्धतीने वागला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी.बहिरवाल यांच्या न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने जहागीर मिर्झा याला पाच दिवस साधा कारावासची शिक्षा व हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन दिवस सध्या कैदेची शिक्षा सुनावली. दोषारोपपत्र सहायक निरिक्षक धिरज महाजन यांनी सादर केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रमोद पाठक होते.निकाल देतांना न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. संसर्ग सार्वजनिक ठिकाणी टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याबाबत संबधीत यंत्रणांनी सुचना जाहीर करूनही नागरिकांनी बेजबाबदारपणाचे वर्तन टाळावे. सबळ कारणाशिवाय आरोपीने सदर स्वरूपाचे केलेले वर्तन हे कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत गंभीर स्वरूपाचे असल्याने जास्तीत जास्त शिक्षेद्वारे दंडनीय ठरविणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे म्हणून आवश्यक ठरत असल्याचे म्हटले आहे.जिल्ह्यात मास्क न लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने खळबळ उडाली आहे.