अखेर १०० वर्षापूर्वीचे जुने ‘अ‍ॅडन्सोनिया’चे झाड कोसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:38 IST2020-06-05T12:38:40+5:302020-06-05T12:38:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आकर्षित करणारे पुरातन अ‍ॅडन्सोनियाचे वृक्ष अखेर बुधवारी रात्री ...

Finally, the 100-year-old Adansonia tree collapsed | अखेर १०० वर्षापूर्वीचे जुने ‘अ‍ॅडन्सोनिया’चे झाड कोसळले

अखेर १०० वर्षापूर्वीचे जुने ‘अ‍ॅडन्सोनिया’चे झाड कोसळले

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार शासकीय विश्रामगृहात बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना आकर्षित करणारे पुरातन अ‍ॅडन्सोनियाचे वृक्ष अखेर बुधवारी रात्री निसर्गवादळाच्या तडाख्यात कोसळले. त्यामुळे या पुरातन वृक्षाचे अस्तित्व आता संपुष्टात आले आहे.
नंदुरबार शासकीय विश्रामगृहाच्या आवारात प्रवेशद्वारासमोरच येणाºया पाहुण्यांचे भव्य पुरातन वृक्ष स्वागत करत होते. अ‍ॅडन्सोनिया असे या वृक्षाचे नाव होते. त्याला भारतीय भाषेत गोरख चिंच म्हणून ओळखले जाते. या झाडाची उंची साधारणत: २० मीटर पर्यंत तर व्यास १० मीटर होता. हे वृक्ष विश्रामगृहाच्या बांधकामापूर्वी म्हणजे जवळपास १०० वर्षांपूर्वी तेथे लावण्यात आले होते. पुरातन वृक्ष असल्याने बांधकाम विभागानेही या वृक्षावर त्याची माहिती त्यावर दिली होती. हे झाड औषध म्हणूनही गुणकारी मानले जायचे. त्या झाडाची साल व फळाचा गर तापावर, हिवतापावर, पोटाचे विकार, मुत्रपिंडाचे विकार, रक्तदोष यावर गुणकारी असल्याचे त्यावर लिहिले होते. येणाºया जाणाºया प्रत्येक पाहुण्याला ते आकर्षित करीत होते. परंतु बुधवारी निसर्ग वादळाच्या काही प्रमाणात पडसात जिल्ह्यातही होते. रात्री साडेदहा ते ११ वाजेच्या दरम्यान वाºयाचा वेग जास्त होता. या वाºयातच हे वृक्ष उन्मळून पडले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. पण वृक्षा समोरच्या उद्यानाच्या वॉल कम्पाऊंडच्या भिंतीला मात्र त्याचे नुकसान झाले. हे वृक्ष कोसळल्याने शहरातील पुरातन वृक्षाचे व बाहेरून येणाºया पाहुण्यांना आकर्षित करणाºया या वृक्षाचे अस्तित्व संपल्याचे मानले जाते.

लहान शहादा : निसर्ग वादळासंदर्भात हवामान खात्याने आगाऊ सूचना दिल्याने भितीपोटी ग्रामीण भागातील जनतेने रात्र जागून काढली. लहान शहादेसह परिसरातील अनेक गावातील लोकांनी रात्रीचे जागरण केले. दरम्यान वादळाचा धोका टळल्याने लोकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. परिसरात बुधवारी दुपारपासूनच जोरदार वाºयासह पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. कोळदा-खेतिया रस्त्याचे काम सुरू असून, काही ठिकाणी केवळ खोदकाम करण्यात आले आहे. कोळदा व लहान शहादा गावाजवळ फरशीच्या कामासाठी खड्डे खोदल्याने तेथे पाणी भरले होते. हे पाणी गावांमध्येही शिरले. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. वाहनधारकांसाठीही हा रस्ता त्रासदायक ठरल्याने गुरूवारी अनेक दुचाकी वाहनधारक या मार्गावर घसरल्याने अपघाताच्या घटना घडल्या. दरम्यान गुरूवारी दुपारनंतरही परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले.

Web Title: Finally, the 100-year-old Adansonia tree collapsed