शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानासोबत विद्याथ्र्याची घट्ट मैत्री करुन देणारे प्रयोगशील ‘शिक्षक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विद्याथ्र्याची विज्ञानाप्रती जिज्ञासा वाढून त्यातून नवनवीन प्रयोग व्हावेत म्हणून सातत्याने परीश्रम घेणारे शिक्षक म्हणून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विद्याथ्र्याची विज्ञानाप्रती जिज्ञासा वाढून त्यातून नवनवीन प्रयोग व्हावेत म्हणून सातत्याने परीश्रम घेणारे शिक्षक म्हणून दिनेश वाडेकर यांची ओळख आह़े शहरातील डी़आऱ हायस्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून काम करणारे दिनेश वाडेकर यांना माध्यमिक विभागातून राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आह़े 2002 पासून डी़आऱ हायस्कूलमध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत असलेल्या दिनेश वाडेकर हे विद्याथ्र्याच्या सर्वागीण विकासासाठी तळमळीने कार्य करत आहेत़ अत्यंत हालाखीच्या स्थितीत स्वत:च्या पायावर शिक्षण घेत त्यांनी शिक्षकीेपेशा स्विकारला़ समाजसेवा, विज्ञानछंद मंडळ, महाराष्ट्र गणित व विज्ञान अध्यापक महामंडळ, राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, विज्ञान प्रदर्शन, एड्स जनजागृती, नेत्रतपासणी, सर्वशिक्षा अभियानांतर्गत तज्ञ मार्गदर्शक आणि हरीतसेना यांच्या माध्यमातून त्यांनी राज्यस्तरीय शिबिरांमध्ये सहभाग नोंदवला होता़ यादरम्यान विद्याथ्र्यामध्ये ऐतिहासिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वाढावा म्हणून विविध स्थळांना भेटी आयोजित केल्या होत्या़ अत्यंत कमी काळ रजा घेणा:यांपैकी एक असलेले वाडेकर हे विद्यार्थीप्रिय शिक्षक आहेत़ विज्ञानासोबत निगडीत असलेल्या विविध शैक्षणिक संस्थांसोबत कार्य करत असताना विद्याथ्र्यासाठी वैज्ञानिक उपक्रमांचे आयोजनही त्यांनी सातत्याने केले आह़े शिक्षण विभागाकडून होणा:या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात सलग आठ वेळा सहभाग नोंदवून राष्ट्रीय स्तरावर तीन वेळा निवड झाली आह़े राष्ट्रीय स्तरावर दोन वेळा प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान त्यांना मिळाला आह़े 

विद्याथ्र्याना विज्ञानाची माहिती मिळावी म्हणून ते विज्ञानसोबत निगडीत असलेल्या शोधनिबंधांचे वाचन वर्गामध्ये घडवून आणतात़ नवनवीन गॅङोटस आणि वैज्ञानिक प्रयोग यावर विद्याथ्र्याचा खुला संवाद घेत त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करतात़ यातून जिज्ञासू विद्यार्थी नियमित त्यांच्या संपर्कात राहून ज्ञानाजर्न करत आहेत़