शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या प्रहरी उन्हात बसणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  सकाळच्या सुमारास गल्लीमध्ये उन्हात बसलेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  सकाळच्या सुमारास गल्लीमध्ये उन्हात बसलेल्या दोन महिलांना कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ५० वर्षीय महिलेच्या मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळच्या सुमारास घडली.तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली असून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तळोदा शहरातील खान्देशी गल्लीमध्ये राहणाऱ्या विजयाबाई भगवान कलाल (वय ५२ ),रेहनाबी शेख या दोघी अंगणात सकाळच्या कोवळ्या उन्हात बसल्या  होत्या.त्यावेळी त्यांना लाल रंगाची चारचाकी भरधाव कारने ( क्रमांक एम एच ३९ जे ६४१६) जोरदार ठोस दिली.या अपघातात विजयाबाई कलाल व रेहनाबी शेख यांना गंभीर दुखापत झाली.त्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली. त्याठिकाणी विजयाबाई कलाल यांना मृत घोषित करण्यात आले तर रेहनाबी शेख यांनी पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात    आले.या अपघात प्रकरणी संबधीत चालक विरुद्ध तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  रुबिनाबी शेख रियाद यांच्या फिर्यादीवरून आरोपी तिरथ उमाकांत शेंडे रा.खान्देश गल्ली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर पाकळे हे करीत आहे.दरम्यान शहरातील गजबजलेल्या रहिवासी परिसरात अशाप्रकारे अपघातात विज्याबाई कलाल यांचा अकस्मात मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुर्देवी मृत्यूमुळे खान्देशी गल्लीत हळहळ सद्या थंडीचे प्रमाण जास्त आहे. सकाळी १० वाजेपर्यंत गारठा असतो. त्यामुळे सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेण्यासाठी नेहमीप्रमाणे खान्देशी गल्लीतील या महिला देखील बसल्या होत्या.  आपल्या गप्पांमध्ये मग्न असतांना अचानक आलेल्या कारने या महिलांना उडवले. काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडल्याने मदतीसाठी देखील अनेकजण धावले. परंतु विजयाबाई कलाल यांना जबर मार लागल्याने त्यांचा त्यात मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.