कोरोना रॅपिड टेस्टिंग तपासणीचे साहित्य भर चौकात उघड्यावर फेकल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:27 IST2021-03-22T04:27:30+5:302021-03-22T04:27:30+5:30

कोरोना रॅपिड टेस्टिंग चाचणी घेतांना त्यात अनेकजण पॉझिटिव्ह आले असतील. हा गंभीर प्रकार असून आरोग्य विभाग व ...

Excitement as the corona rapid testing material was thrown into the open at Bhar Chowk | कोरोना रॅपिड टेस्टिंग तपासणीचे साहित्य भर चौकात उघड्यावर फेकल्याने खळबळ

कोरोना रॅपिड टेस्टिंग तपासणीचे साहित्य भर चौकात उघड्यावर फेकल्याने खळबळ

कोरोना रॅपिड टेस्टिंग चाचणी घेतांना त्यात अनेकजण पॉझिटिव्ह आले असतील. हा गंभीर प्रकार असून आरोग्य विभाग व नगर पालिका प्रशासनाने स्वॅबचे साहित्य भर चौकात का फेकून दिले ? या परिसरात रात्री अनेक नागरिक येथे बसण्यासाठी येत असतात लहान मुले देखील या परिसरात खेळतात. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्ये चंद्रकांत नगराळे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी व कार्यालयीन अधीक्षक अनिल सोनार यांना संपर्क केला परंतु प्रतिसाद न मिळाल्याने साहित्यापासून कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून चंद्रकांत नगराळे व नागरिकांनी सदर रॅपिड टेस्टिंग स्वॅबचे साहित्य रात्री साडेदहाच्या सुमारास जाळून टाकले. नगर पालिका व आरोग्य विभागाने अशा गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

चूक माणसांकडून होते परंतु त्या चुकीने इतरांच्या जीवितास धोका निर्माण होत असेल तर ती गंभीर बाब आहे.

हा हलगर्जीपणा आरोग्य विभागाचा की नगर पालिका प्रशासनाचा? यापुढे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून संबंधित प्रशासनाने यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Excitement as the corona rapid testing material was thrown into the open at Bhar Chowk