शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
5
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
6
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
7
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
8
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
9
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
10
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
11
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
12
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
13
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
14
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
15
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
16
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
17
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
18
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
19
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
20
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांनी पाळला ‘नो व्हेईकल डे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 13:13 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यास मदत होण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी व धावपळीच्या ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरातील वाहतुकीची कोंडी सोडवण्यास मदत होण्यासाठी त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणासह इंधन बचत व्हावी व धावपळीच्या युगात शरीराला किमान एक दिवस व्यायाम व्हावा यासाठी प्रायोगिक तत्त्वावर मंगळवारी शहादा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वाहन न वापरण्याचा निर्णय घेऊन प्रायोगिक तत्वावर ‘नो व्हेईकल डे’ अनोख्या पद्धतीने साजरा केला. यापुढील प्रत्येक मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांनी या अनोख्या उपक्रमात स्वयंस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.धावपळीच्या युगात प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली असल्याने शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आज वेळ नाही. परिणामी विविध व्याधी जडत असतात. नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे असतानाही ते शक्य नसल्याने नागरिकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचप्रमाणे वाहनांची संख्या वाढल्याने शहरातील अरुंद रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होते. वाहन चालकांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर केल्यामुळे इंधनाची विक्री सर्वाधिक होत आहे. त्याचप्रमाणे वाहनांमधून निघणाऱ्या धुरामुळे वातावरण प्रदूषित होते. या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कुठलेही वाहन न वापरता दैनंदिन काम करण्याची संकल्पना शहादा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मंगळवारी प्रायोगिक तत्त्वावर राबविली. सर्व कर्मचारी आज आपल्या घरून कार्यालयात पायी चालत आले व त्यांनी दैनंदिन कामकाज केले.राज्य शासनातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अभियान हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत ‘माझी वसुंधरा अभियान’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्याचा प्रमुख उद्देश आहे. यात आठवड्यातून एक दिवस ‘नो व्हेइकल डे’ अर्थात यादिवशी पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी व नागरिकांनी कुठलेही वाहन न वापरता पायी अथवा सायकलीद्वारे आपले दैनंदिन कामकाज करावे, हा प्रमुख उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत शहादा नगरपालिका सहभागी झाली असून मंगळवारी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर ‘नो व्हेइकल डे’ साजरा करून मोहिमेचा शुभारंभ केला आहे.

नागरिकांनीही सहभागी व्हावे‘माझी वसुंधरा’ अभियानाअंतर्गत शहरातील प्रत्येक नागरिकाने आठवड्यातून एक दिवस वाहन वापरायचे नाही. एक दिवस पायी चालणे अथवा सायकल वापरणे आवश्यक आहे. मंगळवार हा आठवडे बाजाराचा दिवस  असल्याने यादिवशी ज्यांना शक्य आहे त्या सर्वांनी आपली सगळी कामे फक्त पायी अथवा सायकल वापरूनच करायची, कोणीही मोटारसायकल किंवा चारचाकी वाहन वापरु नये. आठवडयातून फक्त  मंगळवारी ‘नो व्हेइकल डे’ साजरा करायचा आहे. या अभियानाची सुरुवात पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयापासून केली आहे. यापुढे या उपक्रमात सर्व शहादेकर याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतील व सहभागी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नागरिकांनी या महत्त्वाकांक्षी उपक्रमात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी केले आहे.