शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा शहरात रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळोदा शहरातील नागरिकांच्या रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र ...

नंदुरबार जिल्ह्यात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तळोदा शहरातील नागरिकांच्या रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, सहाय्यक जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, तहसीलदार गिरीश वखारे, मुख्याधिकारी सपना वसावा, पोलीस निरीक्षक पंडित सोनावणे यांनी नियोजन करून तळोदा शहरातील सर्व वाहतूक कर्मचारी, रिक्षा चालक, पेट्रोल पंप कर्मचारी, गॅस एजन्सी कर्मचारी, मजूर, फेरीवाले, फळ विक्रेते दुकानदार, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार, किरकोळ विक्रेते, हातगाडी किरकोळ सामान विक्री करणारे तसेच नगरपालिका हद्दीतील सर्व व्यापाऱ्यांची रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्याबाबत आदेश प्राप्त झाले असून संबंधित प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात येत आहे.

रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, नगरपालिका, शिक्षण विभाग, पोलीस प्रशासन यांचे समन्वय करून चाचणी मोहिमेसाठी आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नगरपालिका मार्फत सामुदायिक वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, शिक्षक, नगरपालिका कर्मचारी प्रत्येक विभागातून एका कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात रॅपिड ॲंटिजेन चाचणी करण्यासाठी ३ पथके तयार करण्यात आली आहेत. बस स्टँड, बंसाली प्लाझा, स्मारक चौक या परिसरात चाचणी करणार असून पथकाचे प्रमुख सामुदायिक वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पटेल, डॉ. जितेंद्र बिरारे, डॉ. वळवी, सदस्य आरोग्य सेवक मनोज पिंजारी, फेंदा पावरा, जगदीश नाईक, शिक्षक डाटा एंट्रीसाठी चेतन खैरनार, प्रदीप पडोल, पोलीस कर्मचारी पिंटू अहिरे, नगरपालिका कर्मचारी समन्वयक आरोग्य सहाय्यक अशोक पाडवी, आरोग्य व स्वच्छता विभाग निरीक्षक नगरपालिका आश्विन परदेशी यांचा रॅपिड ॲंटिजेन चाचणी पथकात समावेश आहे.