शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनामुळे शाळांना सुट्या असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनामुळे शाळांना सुट्या असल्या तरी विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा लाभ मिळावा म्हणून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत तालुक्यातील २७ हजार ९३१ विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्यात आला आहे.तालुक्यात विविध १४ केंद्रांतर्गत एकूण २४४ प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये २७ हजार ९३१ विद्यार्थी शिक्षण घेत असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या सूचनेनुसार प्रत्येक शाळेत कोरोना काळातील नियमांचे पालन करीत पोषण आहाराचे वाटप झाले. गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांच्यासह त्या त्या भागातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य व शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे वाटप झाले. त्यात ८३८ क्विंटल तांदूळ, ९३ क्विंटल १९ किलो मसूरदाळ, ८६ क्विंटल १८ किलो मटकी, १३० क्विंटल ८६ किलो हरभरा असे वाटप करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलवून हे वाटप करण्यात आले. दरम्यान, याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी यांनी पालकांना पोषण आहाराचा वापर योग्य पद्धतीने करून विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडेही लक्ष देण्याच्या सूचना केल्या.