शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशा येथे शेतकऱ्याकडून केळीचे घड वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:04 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : शेतात परिपक्व झालेली केळी, पपई, टरबूज ही पिके खराब होत आहेत. हा माल खरेदीसाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : शेतात परिपक्व झालेली केळी, पपई, टरबूज ही पिके खराब होत आहेत. हा माल खरेदीसाठी व्यापारीही येत नसल्याने मातीमोल भावात विकावे लागत आहे. प्रकाशा येथील शेतकरी भरत दशरथ पाटील यांनी त्यांच्या शेतात पिकवलेली सुमारे तीन ट्रॉली केळीचे घड गावातच मोफत वाटप करीत आहेत.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद आहेत. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून केळी, पपई, टरबूज या नाशवंत पिकांचे जास्त नुकसान होत आहे. या पिकांच्या खरेदीसाठी व्यापारीही येत नसल्याने मातीमोल भावात ती शेतकऱ्यांना विक्री करावी लागत आहेत. प्रकाशा येथील शेतकरी भरत दशरथ पाटील यांनी आपल्या सात एकर क्षेत्रामध्ये केळीची लागवड केली आहे. त्यांच्या शेतातील केळी निघत असून लॉकडाऊन होण्यापूर्वी काही केळी त्यांनी विक्री केली. मात्र सद्यस्थितीत सर्व केळी शेतातच पडून आहे. केळी खराब होत असल्याने त्यांनी तीन माणसे रोजंदारीने लावून ट्रॅक्टर ट्रॉलीत भरुन गावात मोफत वाटप करीत आहेत.पपई व टरबूजचीही अशीच परिस्थिती असून अत्यंत कमी भावात त्यांची मागणी होत असल्याने या पिकांवर केलेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, दादर या पिकांची काढणी करून हा शेतमाल घरात पडून आहे. बाजार समितींचे व्यवहार बंद असल्याने शेतकºयांना शेतमाल विक्री करता येत नसल्याने त्यांच्यापुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून शासनाने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

मी सात एकर क्षेत्रामध्ये केळी लावली आहे. एक महिन्यापूर्वी १३०० रुपये दराने २० टन माल विकला. सद्यस्थितीत खरेदीसाठी व्यापारी येत नसून जे येतात ते चक्क २५० ते ३०० रुपये प्रती टन दराने मागणी होत आहे. म्हणून मी गावातच मोफत केळीचे घड वाटप करण्याचा निर्णय घेऊन माणसे लावून ते वाटप करीत आहे. शासनाने यावेळी शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.-भरत दशरथ पाटील,शेतकरी, प्रकाशा, ता.शहादा