सिलींगपूरातील महिलांची दारूबंदीची मागणी

By Admin | Updated: May 24, 2017 11:56 IST2017-05-24T11:56:06+5:302017-05-24T11:56:06+5:30

तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथे समस्या

Demand demand for women in silting | सिलींगपूरातील महिलांची दारूबंदीची मागणी

सिलींगपूरातील महिलांची दारूबंदीची मागणी

 ऑनलाईन लोकमत

नंदुरबार,दि.24- तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथे दारूबंदीचा ठराव करूनही गावात दारू विक्री सुरू आह़े यामुळे युवक आणि ग्रामस्थ यांच्यात व्यसनाधिनता वाढत असल्याने कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन गावातील महिलांनी पोलीस अधीक्षक यांना दिल़े 
या निवेदनात महिलांनी म्हटले आहे की, 1 मे रोजी सिलींगपूर ग्रामपंचायतीच्या सभेत गावात दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता़ यानुसार गावात दारू विक्रेत्यांना 20 हजार रूपये दंड ठोठावण्यात आला आह़े मात्र 1 मे नंतरही गावात दारू विक्री सर्रासपणे सुरू आह़े प्रसंगी गावातील ज्येष्ठ महिला सुमित्रबाई जयकर, विजयबाई नाईक, राहिलबाई मार्गे, कुसूमबाई ठाकूर, रोशनबाई मार्गे, लताबाई गारदी, सुनिता पंजाबी आशा शेमळे, ए़आऱनाईक यांनी पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केली. 
निवेदनावर विजयबाई मोरे, पुष्पाबाई मोरे, सविता ठाकरे, सगुणाबाई शेमळे, अरूणाबाई नाईक, कुसुमबाई ठाकूर, नितू पवार, रजनी मार्गे, स्नेहप्रभा साने, वायलेट इंगळे, अनिता पवार, कृपा नाईक, जयवंतीबाई नाईक, हर्षदा ठाकरे, सुरक्षा नाईक, पुष्पा साळवे यांच्यासह गावातील 100 महिलांच्या स्वाक्ष:या आहेत़ 

Web Title: Demand demand for women in silting